Posts

Showing posts from June, 2010

बॅन्डीट क्वीन आणि रणरणतं ऊन

आठवणी येताहेत. रक्त लाल फुल फुलताना गुल्मोहराच्या अंगावर शहारा आला होता त्याच्या हळुवार आठवणी येताहेत. बेसावध अखंड कातळावर पडलेल्या पहील्या घणाच्या आठवणी येताहेत. आठवणी येताहेत लिरिकल प्रवाही नदीच्या, त्यात वाकलेल्या आकाशाच्या. नाजूक क्षणी पत्थरात बंद होवून जीवाश्म झालेल्या पानाच्या नाजूक नक्षीदार खुणांच्या आठवणी येताहेत. आठवणी येताहेत..पण थांब. आठवणी म्हणजे मुठीत बंद छोटा सजीव पक्षी. सारेच आठवते म्हणावे तर काल कराल मुठीत चिरडुन टाकेल त्या पक्ष्याला. नाही तर कश्या, स्वैर उडवुन टाकेल सारया रमलखुणा. विवेक, त्याचं नाव. काय करायचा? लॉ करायचा. काय करायचा? -?? का-य करायचा? जगण्यासाठी? नाटकं! फार उंची नव्हती त्याला, खोलीही नव्हती तेव्हा पण डोळे विझले नव्हते अजून. तासं तास नाटकं, नेपथ्य, लाईट्सच्या चर्चा करायचा. एकदा ऎन दुपारचा धडकला. शब्दशः धडकला. तास भर बोलु नको म्हणाला. उद्ध्वस्त डोळ्यांनी फकाट छत शोधत राहीला. छातीभर श्वास घेऊनही आभाळ मावेना तसा गळाभरुन रडला. नुक्ताच बघितलेला बॅन्डीट क्वीन परत परत उपसत राहीला. विवेक? विवेकच असावं त्याचं नाव बहुदा. आपल्याला उगाच वाटत राहातं, ऑर्कुट, गुगलवर स...