Posts

Showing posts from August, 2011

चौकटी बाहेरचं गाणं: मुझे जां ना कहो मेरी जां...

काही समज असतात म्हणजे पक्केच असतात. उदा. सिनेमातलं गाणं म्हणजे किशोर आणि लता. मापटं दाबून दाबून मी त्यात आशा बसवतोच, पर्यायच नाही. सिनेमातलं गाणं म्हणजे आर डी., सलीलदा वगैरे वगैरे. जिनिअस लोकांमधे असली प्रतवारी करायलं बसलं की तुम पुकार लो वाला हेमंतकुमार, आपकी याद आती रही वाली छाया गांगुली, लग जा गले वाला मदन मोहन, सिने मे जलन वाला जयदेव ते पार.. दिल से वाला रहमान येऊन आपल्याकडे "यू तुच्छ!" अशी नजर टाकताहेत असा सॉलीड भास होतो. तोंडावर असं सण्णकुन आपटल्यावरही जित्याची खोड जात नाही. मग ठरवलं काही तरी सर्वसमावेश (!) करु आणि आपल्याला बिनतोड कोण आवडतं ते एकदाचं (हाय...) ठरवुनच टाकु. निवांतात कॉम्बिनेशन्स बघायला बसलो. लता- आर डी- गुलजार, आशा- आर डी - गुलजार इ. इ. म्हटलं यातून लसावि काढू आणि वा वा....गणित आणि कला यांचा अपूर्व संगम घडवुन आणि. . हे वेडेचाळे अजून किती चालले असते माहीत नाही पण मुझे जां ना कहो मेरी जां..आठवलं आणि खेळ खल्लास झाला. जिनिअसांमधे नंबरांची उतरण कसली लावायची? गाणं- गुलजार संगीत- कनु राय आवाज- गीता दत्त मेरी जां, मुझे जां ना कहो, मेरी जां जां ना कहो

थोडंसं झेन आर्ट मालिकेबद्दल

झेन म्हटलं की बुद्धीझम, ताओइझम इ आठवतं. झेन (>>...चॅन>>...ध्यान!) म्हणजे स्वतःत डोकावुन बघणं/ स्व चा शोध घेणं. झेन म्हणजे अवघडाला बाजुला काढून सोपं होणं. झेन आर्ट ऑफ सुसाईड मालिकेतल्या गोष्टी आत्महत्यांच्या नाहीत. To drift like clouds and flow like water हे झेन मधे महत्वाचं मानलं जातं. म्हणून कथेतल्या पात्रांच्या आयुष्यात जे लादलं गेलेलं होतं, जो गाभा नव्हता त्याच्या नष्ट होण्याविषयीच्या त्या कथा आहेत. असं म्हटलं जातं की पाश्चिमात्य कलाकार स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांचं त्याच्या कलाकृतीवर रोपण करतो. थोडक्यात त्याच्या चश्म्यातुन आपण ती कलाकृती बघु पाहातो. या उलट पौर्वात्य कलाकार, खासकरुन झेन कलाकृती विशेष कोणताही आवेश न आणता, रंग, शब्द इ चे बंधन झुगारुन अत्यंत सोप्या भाषेत अभिप्रेत अर्थाच्या मुळाशी पोचतात (उदा. बाशोची ही कविता- Even that old horse । is something to see this । snow-covered morning ). माझ्यासाठी झेन आर्ट ऑफ सुसाईड ही मालिका हा एक प्रयोग होता. प्रत्येक कथेचं बीज आणि त्यांचे फॉर्म्स हे प्रयोगाच्या खाजेखातर वेगवेगळे नव्हते तर ती त्या कथावस्तुची गरज होती. बुडब

झेन आर्ट ऑफ सुसाईड- शुन्याखाली गोठणबिंदु

बर्फात कवीची पावलं उमटतात; केवळ म्हणून मर्त्य म्हणायचं तुला. हिवाळ्यात रंगांचे साजिरे उत्सव सुरु असताना श्वेतांबर तुझे अस्तित्व बर्फाच्छादीत टेकडीच्या पार्श्वभुमीवर कणाकणाने उदयाला येते. "त्वचेशी एकरुप असावेत असे शुभ्र कपडे घालतेस?" माझ्या कुतुहलाला अंत नसतो आणि तूही उत्तराला बांधील नसतेस. आत्म्याच्या विणीचा किंचित उसवलेला धागा असावा तसं आपलं सहचर्य- विमुक्त बांधलेलं. "Dare you see a Soul at the White Heat?" प्रश्नाची धार बोथट करायला उलट प्रश्नांची भक्कम तटबंदी काही क्षणात उभी करु शकतेस तू. कवीला अशक्य काहीच नसतं. "If White- a Red-must be!" रक्ताच्या काळसर लाल रंगाचं तुला कोण आकर्षण! "फलाटाकडे धावत येणारी आगगाडी पाहीली की सारे बांध फोडून रुळांखाली झोकून द्यावं वाटतं." मी विलक्षण भेदरलेला, तुझा हात गच्च धरुन हिवाळ्यात गोठलेल्या स्टेशनवर शुन्यवत नेहमीचा उभा. "नजरेचं संमोहन भेदून उंच इमारतीच्या गच्चीतून तळाकडे सुर मारावा. आधी शुभ्र त्वचेवर उमटेल डाळींबी नक्षीचा टपोरा दाणा, मग शुभ्र कपड्यांवर आणि मग शुभ्र बर्फावर आख्खं लाल क