Posts

Showing posts from June, 2007

पाऊस

सगळ्या आकाशवाण्यातून (आकाशातला वाणी नव्हे तर आकाशवाणीचं अनेकवचन)सुखरुपपणे पार पडत एकदाचा पाऊस आला. नेहमी प्रमाणे मुंबईला पुर आलाय, झोपड्या वाहून काही लोक मेलेत, निर्लज्जासारखे आपले नेते त्यासाठी कोण जबाबदार आहेत त्यांची जंत्री टीव्ही समोर वाचताहेत, पेपरवाले पिक्चरमधला पाऊस या नावाखाली कित्येक वर्षे राज-नर्गिस आणि टिपटिप बरसा पानी वाली रविना छापताहेत. पण पाऊस काय हा एव्हढाच असतो? अरे हट्ट! ते वेडपट डबडं बंद करा आणि डोळे मिटा आणि शाळेत कधीतरी शिकलेली बालकवींची "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे" आठवा. सोनलच्या मित्रानी लोणावळा फिरवला होता आम्हाला. तो तिथलाच त्यामुळे "नेहमीचंच सुप्रसिद्ध" टाळून त्यानी आम्हाला कुठेतरी दूर नेलं होतं, लोकांच्या पुरापासून लांब. खच्चून पसरलेलं मैदान, त्यावर सुखासीन लोळलेलं गवत, मधूनच झिरपणारा पाऊस, कधी डोळा चुकवून येणारं ऊन..असं वाटलं ठोमरेसाहेब इथेच कुठेतरी कोपरयात बसून श्रावणमासी लिहीत असतील. एका बाजूला कडेलोटासारखा डॅममधून ओतलं जाणारं पाणी आणि दुसरया बाजूला कवितेसारखं किंचित उलगडल्या सार

महिलामंडळ उर्फ लोबागंटि

हात चालू राहाण्यासाठी लिहीलेला हा blog आहे. ... ********************************************************************* नवी शाळा बघून माझ्या तोंडातून फास्टर फेणे सारखा "टॉक्क्क" आवाज निघाला असणार! वय वर्षे ३-४ असताना दादांनी मला दुसरया एका शाळेतून आणून इथे transplant केला होता. चौथीयत्तेत असणारया ताईच्या जीवावर मी दिवारच्या बच्चनसारखी महिलामंडळ उर्फ लोबागंटि असं विचित्र नाव असणारया शाळेत एंट्री मारली. "महिलामंडळ" कारण ही शाळा बायकांनी चालवली होती आणि बालवाडीनंतरच्या शाळेचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं होतं तर थोडक्यात "महिलामंडळ उर्फ लोबागंटि." शाळेचं location amazing होतं. एका बाजूला उन्हाळ्यात शेवाळून वास मारणारं तळं आणि दुसरया बाजूला वडारवाडी!! शाळेत "बालकांना" रोज फुकट खाऊ मिळत असल्याने बाजूच्या वाडीतली बरीच "बालकं" शाळेत यायची. पुढे २-३ वर्षांनी कळाल की ही अजाण बालकं ५-१० पैशाच्या गोळ्यांच्या बदल्यात शाळेत येणारया मुलांच्या मागे on demand कुत्री वगैरे लावू शकतात. सुपारी घेणे ही संज्ञा फार पुढे ऎकिवात आली!! तर अशी ही त्यामुळे शाळ

अर्धा माझा भास..अर्ध सत्य तुझे..त्याच्या साठी ओझे आभाळाचे

प्रिय ग्रेस, "संध्यामग्न पुरुषाची लक्षणे" वाचतोय सध्या. अत्यंत अभिरुचीहीन कव्हर केलय तुमच्या पुस्तकाचं, मनापासून वाईट वाटलं. असं या आधीतरी कधीच झालं नव्हतं, मग आत्ताच का? पुस्तक जुनं वाटावं किंवा स्वस्तातलं वाटावं इतकं कव्हर टाकाऊ? सुभाष नेहमीच तुम्हाला "वाचतो", मग हा त्याचा प्रयोग म्हणायचा की काय? तसं असेल तर फसला असं वाटतय. सामनातल्या तुमच्या लेखमालेचं पुस्तक म्ह्टल्यावर जरा धास्ती होतीच. तुम्ही काही "लिही" म्हटलं की लिहीणारया पंथातले नव्हे. त्यात या कव्हरची भर. अजून पुस्तक वाचतोच आहे आणि अजूनतरी कुठेच शॉक लागलेला नाही. "मृगजळाचे बांधकाम" सुरुवातीपासूनच जड गेलं. करायचं म्हणून अवघड केल्यासारखं! हेही त्या पंथातलं असतं तर मात्र एक आत्मीक मैत्र मिटल्याचं दुःख झालं असतं. तुमच्या कविता मी कधीच एका बैठकीत वाचत नाही; नाही सहन होत मला. अंगात भिनण्या आधी स्वःतच अलिप्त होते ती. तुमच्या भाषेत सांगायचं तर "दुःख टेकण्यापुरती संदीग्ध." तुमचा संदर्भ तिथेच संपतो, सीतेच्या जनकासारखा. किंवा तुमच्या आणि जीएंच्या झाल्यानझाल्या भेटीसारखा. तिथून पुढे ती कवि

ये क्या जगह है दोस्तों...

च्यायला सगळच भोसडलेलं आहे. ऑफीसची अंतहीन कामं, एका apprisal cycle चा अंत होण्या आधी दुसरं सुरु ही झालं.. स्कोरकार्ड, रिव्हू, नवे नवे initiatives, स्वःतच्या शेपटी भोवती गोल फिरणारया कुत्र्यासारखं attrition आणि recruitment. निवांत पेपर वाचावा तर राजस्थानातले reservation वाले दंगे. कॉंग्रेस आणि फडतूस अर्जुन आणि विपी या दोन शिंगाच्या जनावरांनी लावलेल्या आगी. टीव्हीवर सतत गाण्याच्या स्पर्धा. डोळे आणि नरडं ताणून ओरडणारा हिमेश उर्फ टोपी. गाण्यातलं काहीही कळत नसणारी अलिशा, सगळच गोड मानून घेणारा उदीत आणि चिरकणारी टाळकी. तिसरीकडे मिचमिच्या डोळ्यांचा शान अजून डोळे बारीक करून गेल्या कित्येक शो मधे रिपीट केलेला लाल टी शर्ट घालून अमूलचं दूध पितोय. रस्त्यावरचा महाभयंकर traffic jam आणि कुठलासा दादा-नाना-आण्णा निवडून आल्यानं "इथून धक्का तिथून धक्का मारतोस का?" ची सुरेल आरोळी. गणपती, अण्णा भाऊ ची जयंती-मयंती या सगळ्यांशी indifferent ऊषा मंगेशकर लाऊडस्पिकरच्या उंच भिंतीवर उभारुन झोकात "मुंगळा मुंगळा मै गुड की.." गाते आहे. रस्ते पावसाळ्यात फाटणार याची झलक दिसायला लागलीय...सालं सगळंच कस