Posts

Showing posts from December, 2016

न-लिहीण्याची कविता

येऊ नका सांगूनही शब्द ऎकत नाहीत. अर्थान्वेषी छटांचे पलीते नाचवत शब्द पापण्यांवरुन घरंगळतात आणि लूचत राहातात डोळ्यांमधल्या काळ्या सूर्यांना उताविळ  माझ्या बोटांमधून झरझर झरतात उताविळ तुझ्या बाजारात संदर्भांची वस्त्रे फेडून ऊठवळ शब्द नागवे होतात अझदारी! बोथट चवीचे शब्द उन्मादात घेरतात छाती पिटत भोसकत राहातात उखाणातल्या तेविसाव्या श्रुतीला साजिरा मातम अझदारी... डोळ्यात मिटून घेतलेल्या काळ्या सूर्याचा साजिरा मातम अझदारी... दिवंगत दिगंबर अर्थाचा