Posts

Showing posts from March, 2011

अनु का बाई सु अनु का बाई या- अनु का बाई अन्सुया

यत्ता सहावीतला चि. सव्यसाची बुक्कलवार वर्गभेदाचा बळी पडला म्हणणं म्हणजे जगाला प्रेम अर्पावे ही वैषयिक कविता आहे म्हणण्यासारखंच झालं. पण चि. सव्यसाचीच्या मते तरी तसंच झालं होतं. परंपरागतरित्या अ, ब, क आणि ड तुकड्यांना काही अर्थ होता आणि दुसऱ्या गावाहुन बदली होऊन आल्यानंच आपण ड तुकडीत ढकलले गेले आहोत हा त्याचा ठाम समज शाळा सुरु होई पर्यंत राहाणार होता. ऎन उन्हाळ्यात नव्या गावात यावं लागल्यानं शेजारच्या बंगल्यातली लिला देशपांडे सोडली तर त्याची कुणाशीही ओळख होऊ शकली नव्हती. "पाचवी-सहावीतली मुलं तुम्ही. कसलं मुलगा-मुलगी करता रे?" असं आईनं दहावेळा वैतागुन म्हटलं तरी लिला देशपांडे ही मुलगीच आहे या बद्दल चि. सव्यसाचीला तिळमात्र संशय नव्हता. ती फ्रॉक घालायची, तिच्याकडे चेंडु-बॅट ऎवजी बाहुल्या होता आणि ती मठ्ठासारखी पुस्तकं वाचायची तरीही तिच्याशी खेळण्यावाचून पर्याय नाही हे कळून चि. सव्यसाचीला अव्यक्त दुःख झालेलं. पण एक दिवस त्यानं पुढाकार घेऊन जमेल तेव्हढं मऊ आवाजात लिला देशपांडेला म्हटलं"ही बघ तुझी बाब्री. मी तिला डॅन्सच्या स्टेप्स शिकवत होतो तर हिचा हात बघ नां. काई तरी झालं...&

वैती

आज वैती दरबारात उभी होती. अंगावरच्या वस्त्रांच्या चिंधुकल्या सावरल्या तरी विखरुन जातील अश्या विसविसलेल्या. विशेष प्रसंग म्हणून मध्यरात्री भरवलेला दरबार आणि त्यातले खासेच मानकरी वृद्ध डोळ्यांनी वैतीवर चोरुन कटाक्ष टाकत होते. शरीराच्या गरजा भुक आणि हव्यास यांच्या सीमारेषेवर घुटमळत असतात, ज्ञानी अमात्यांच्या मनात नकळत चोरटा विचार आला. सरावाने कमावलेला कोडगेपणा क्षणभरासाठी कमी पडला, पण क्षणभरच. अमात्य दुसऱ्या क्षणी कर्तव्यकठोर प्रधानाच्या भुमिकेत शिरले. आणि आवाजातला करडेपणा न लपवता त्यांनी हलकेच हा दिली "वैती" राजा शौनकाने आपला चिंतातुर चेहरा वैतीकडे वळवला. वैतीला पाहाताना शौनकालाही अंगभर डोळे फुटले. पण आजचा प्रसंग वेगळा होता. "वैती, तुझ्या जंगलातून तुला शोधून आणून या अवेळ दरबारात उभे करण्यामागे काही कारणं आहेत. सुर्याचा किरणही पोचत नाही अश्या गुहांमधे राहातेस तू.जवळपासच्या वस्तीतले लोक घाबरतात तुला. तू म्हणे वशीकरण जाणतेस. पशु-पक्ष्यांना त्यांच्या भाषेत बोलतेस. वस्तीतली तरुण मुलं जंगलात चुकली की तुझी भुल पडते त्यांना. त्यांना कैद करतेस तू तुझ्या चित्रांमधून आणि असंबद्ध गाण्