Posts

Showing posts from 2020

देऊळ

देऊळ   मी     casual believer   आहे. म्हणजे हे माझं हे लेटेस्ट स्टेट्स आहे. मी कट्टर धार्मिक वगैरे कधीच नव्हतो पण मध्यंतरी माझं आणि देवाचं काही फारसं बरं नव्हतं. तेव्हढा एक अपवाद सोडला तर मी साधारणतः casual believer या   प्रकारात रमून गेलेलो आहे. ही जमात अमूक वारी देऊळात जाणं , तमूक उपास करणं , ढमूक मंत्र ’य’ वेळा म्हणणं अश्या   व्याखेत बसत नाही. पण हे करणाऱ्या लोकांबद्दल त्यांची तक्रारही नसते. आणि असं असूनही मला देऊळ या प्रकाराबद्दल विशेष ममत्व आहे. प्रसन्न वाटणारी , गर्दी नसलेली , जुनाट देऊळं चट्कन जाऊशी वाटतात. त्या वास्तुला काही विशेष स्ठापत्य , नदीचा शेजार किंवा दंतकथेचा काठ असावा हे जरुरी नाही. माझ्या आज्जी घरच्या देऊळाला यातलं काहीच नव्हतं. तालुक्याचा जिल्हा होऊन इतिहास झाला तरी अगदी नव्वदीच्या दशकातही लातूर फारसं बदललं नव्हतं. जुन्या लातूरमधल्या वीतभर रस्त्यावरून गर्दी वाहात सिद्धेश्वरच्या जत्रेला जायची. त्याच रस्त्यावर आज्जीचं घर आणि देऊळ होतं. ही गावातली आद्यं दैवतं. नंतर बिर्लाछापाची , समाजदैवतांची , काही ऊन-पाऊस पेलणाऱ्या भव्य मुर्त्यांची मंदीरं उभी राहीली. पण ग्

नव्वदोत्तरी साहित्य

साहित्य जागरच्या अंकासाठी वाचलेल्या लेखाची मुळ प्रत नव्वदोत्तरी साहित्याबद्दल  बोलणं म्हणजे शक्यतांच्या टोकावर आपण डगमगत असल्याची कबूली देणं आहे. या बिंदूपासून असंख्य रस्ते फुटतात ,   काही हमरस्त्याला मिळणारे असतील ,   काही अनवट पायवाटांसारखे असतील तर काही दरीच्या तळाशी पोचवणारेही असतील. मराठी साहित्य यातले कुठले रस्ते निवडेल हे सांगणं कठीण आहे. म्हणून मला आज फक्त काही शक्यता इथं मांडायच्या आहेत. मी इथे तुम्हाला विशिष्ट लेखक   , पुस्तकं सुचवणार नाही ,   किंवा मी बऱ्या वाईटाची समिक्षाही करणार नाही. नव्वदीच्या दशकात मराठी साहित्यात  जे बदल झाले ते का झाले हे जर आपल्याला शोधता आलं तर पुढे येणाऱ्या बदलांचा आपल्याला अंदाज बांधता येईल तेव्हढ्यासाठी हा प्रयत्न. सर्वसाधारणपणे नव्वदीच्या दशकाच्या अध्यातमध्यात दोन ,   तीन मोठे बदल घडले. आधीची दशकं गाजवणाऱ्या अनेक मराठी लेखकांचं लिहीणं उतरणीला लागलं किंवा बंद पडलं ,   राजकारणाचे पट नव्यानं मांडण्यात आले   आणि जागतिकीकरण आपल्या घरात घुसलं.  नव्वदोत्तरी साहित्याबद्दल  बोलायचं तर ,   या बदलांना सुटं न बघता परिक्षानळीत एकत्र ओतणं आवश्यक