Posts

Showing posts from November, 2011

भिन्न षड्ज

हल्ली अचानक चांगलं घडण्यावर फारसा विश्वास उरलेला नाही. चांगलं घडवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि याउपरही काही बरं घडेल याची खात्री कमीच. पण तसं अचानक घडलं खरं. कोऱ्या मनानं क्रॉसवर्डमधे हिंडत असताना सवयीनं एक चक्कर सीड्यांमधून मारली. गेली कित्येक वर्षं एकही सीडी विकली न गेल्यासारखा तो सेक्शन. तेच ते अगम्य इंग्रजी आल्बम, जुनेच जसराज, भिमसेन, तडकामारु पण त्यातल्यात्यात खपावु रिमिक्स आल्बम वगैरे वगैरे. मला इथून हिंडताना शेवाळल्यासारखं वाटतं. तरीही आशाळभुतपणे मी काही वेगळं मिळेल म्हणून चौकस डोळे फिरवले. "भिन्न षड्ज". मी घाईघाईनं सीडी उचलली. एकच होती. कुणी हिसकावुन घेतली तर? नकळत सीडीवरची पकड घट्ट झाली. सीडीत काय आहे हे माहीत असतानाही परत एकदा कव्हर वाचून काढताना आजि म्या ब्रम्ह पाहीलेची अनुभुती आली. खरं म्हणजे मी स्वतःपुरत्या काही चौकटी आखलेल्या आहेत. ब्लॉगवर आवडती सार्वजनिक माणसं आणायची नाहीत हा त्यातला एक महत्वाचा नियम. ब्लॉगवर कविता पिटायच्या नाहीत हाही एक समजुतदार नियम. पण बऱ्याचदा हव्यासापोटी हे नियम मोडले गेले. आतली गाठ नियमांपेक्षा मोठी ठरली. भिन्न षड्ज तर नियमांपलीकडे

रेषेवरची अक्षरे - स्टार माझा

स्नेहलमुळे यावेळी रेषेवरची अक्षरे स्टार माझा वर चमकलाय! थॅन्क्स स्नेहल Thanks to Snehal, Reshewarchi Akshare is covered by Star Maza! http://www.youtube.com/user/starmajha#p/search/0/0k0pisLF3SU