Posts

Showing posts from January, 2008

अस्तित्वशोधाच्या दंतकथा

काही सुचत नसले की मला पंखांच्या आणि बिनपंखांच्या दंतकथा आठवत राहातात. भास पापण्यांना पेलेनासे झाले की त्यांच्या दंतकथा होतात म्हणे. नीज येण्यापुर्वीची ही कथा.. आज जरा वेगळंच. ती हसली. किती ऋतुंनंतर हसली याचे हिशोब करायलाच हवेत असं नाही पण बेदम सैबेरियन हिवाळ्यात एका रशियन राजकन्येचं हसणं नक्कीच अर्थपुर्ण असणार. ती जन्माला आली तेच जन्मदात्रीच्या मुळावर. "कुणी हिच्या गात्या गळ्यातून काळजापर्यंत बर्फाचे खंजीर आरपार नेईल तरच राजघराणं वाचेल. अन्यथा कुलक्षय निश्चित!" राजज्योतिष्याच्या या भविष्यानंतर गेली कित्येकं वर्षं न हसताच राजकन्या या वैराण सैबेरियन वाळवंटात मारेकरयाची वाट पाहात भटकत होती. पण आज जरा वेगळंच. आज ती हसली. ती हसली तसे तिचे गात्र गात्र हसले, क्षणभर कौतुकाने निसर्गही थबकला. आरस्पानी देह तिचा, वयाच्या नाजुक वळणावर स्वतःवरच मनापासुन हसला. "कुणी येणार असेल आज? की माझे डोळेच वाटुलीचे?" ती विचारती झाली. बर्फावरुन प्रकाश परावर्तित होतो तसा आवाजही. आपलाच घंटेसारखा किणकिणणारा आवाज ऎकून ती हिरमुसली पण एकट्या माणसांच्या मनाचे संकेत सहसा चुकत नाहीत. तुर्कस्तानातून जख्

Incomplete three shades of Blue

Sky Blue अपरंपार श्रद्धेने ज्याचा शोध घ्यावा असा अर्थाचा उखाणा कधी सापडलाच नाही आणि आता तू; निर्मितीच्या क्षणांशी एकरुप होण्याची वाट पाहात थांबली आहेस. अभिजात भासांची भुरळ जिला पडते ती ही प्राचीन संदिग्धतेची नगरी कदाचित पुन्हा वाहू लागेल तुझ्या आगमनासरशी Electric Blue भिनतील स्पर्श अंगात तेव्हा डोळ्यात चंद्र वितळत जातील सारया शक्तीनिशी वाचतील मला, स्पर्श नाजूकपणे, आणि बंद डोळ्यातुन निसटूही देणार नाहीत अंगाचा एखादाच तुकडा. संवेदनांच्या सारया टोकांना एकत्र करुन शोषुन घे माझे सारे गंध जड युगासारख्या दीर्घ श्वासातुन. दिवसातुन दिवस, रात्रीतुन रात्र जाऊ देत आणि मला बनु दे तुझ्या शरीराचे एक अविभाज्य अंग Deep Blue Yet to realize...

नव्या वर्षातील संकल्प

संकल्प १: मी इतका प्रसिद्ध आहे याची मला कल्पनाच नव्हती. आफ्रिकेत बहुदा माझा फॅनक्लबच असावा असा माझा अंदाज आहे. हल्ली मला प्रचंड मेल येतात; कितीतरी आफ्रिकन बॅन्कांचे हेड त्यांचे मिलियन डॉलर फंड्स माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायला अगदी उत्सुक आहेत. विमान अपघातात अख्खं कुटूंब नष्टं होतं आणि मग त्यांचे पैसे मलाच स्विकारावे लागतात. किंवा एखाद्या "minor" चे आई-वडिल कुठल्याशा अपघातात नाहीसे होतात आणि मग ती "बिचारी मुलगी" (दरवेळी मुलगीच का?)तिचं पालकत्व आणि पर्यायाने तिच्या अफाट संपत्तीची जबाबदारी "तुम्ही घ्याच नां..." अश्या आवेशात मला मेल लिहीते. शिवाय मी बरेचसे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरत असलो तरी मायक्रोसॉफ्टची लॉटरी मलाच लागते. मी खुप विचार करुन बघीतला पण लक्ष्मीदेवीचं कोणतही व्रत-वैकल्य केलेलं मला स्मरत नाही. तरीही पैसा, तो ही डॉलर मधे, येतोच आहे. या नव्या वर्षाचा संकल्प म्हणून सर्वप्रथम मी अश्या गरजु लोकांना अपमानकारक मेल पाठवणार नाही असं ठरवलं आहे. संकल्प २: अनाहुत फोनवर भरपुर गप्पा मारायच्या. क्रेडिटकार्ड, जॉब ऑफर्स, लोन असे फोन आले की जी कुणी रोजा, मोना, टिना