Posts

Showing posts from July, 2014

अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे

अर्थाच्या गच्च चिखलावर बसून आहे . आशाळभुत कुत्र्यागत शेपूट हलवत शब्दांची झुंबड मेंदुला लगडून असते . एखादा साक्षात्कार भोगावा आणि प्रतिमांचे सुलभीकरण करावे असा नियम नसतोच , तो निव्वळ लिहित्या माणसाचा हव्यास . श्रीयुत ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी, तुम्ही मायन्या पल्याडची माणसं (आणि तशीही तुम्हाला कोऱ्या पत्राचीही सवय आहेच म्हणा) पण अक्षरामागे अक्षर ठेवावे आणि अर्थांची भाषांतरे व्हावीत असा सजीव सोहळा सहज होणे नाही . It's a derived art form my friend. Painters are blessed ones. They can create absolute language. किंवा कसे , तंबोऱ्याची दाणेदार स्वरलिपी ... निर्दोष लावावेत आणि नक्षत्र ओल कंठामध्येच मुरुन जावी तसे. आणि इथे मी , प्रत्येक शब्दापोटी माझ्याच मुळाक्षरांची गुणसुत्रे तपासून घेत आहे . तंद्रीला तीन मिती असतात ; अनुभवांचे टोक निर्ममपणे पारखण्याची , आत्ममग्न लयीची आणि प्रस्तरांच्या पल्याड परकाया प्रवेशाची. अनुभवांचे आरसे वाकवावेत तसंतसे नार्सिस्ट होत जातात. मी... मला... माझे....च्या गारगोट्या अस्पष्ट ठिणग्या उडवत राहातात. उद्धार करण्यासाठी कुणी गोरखनाथ ’चल मच्छींदर गोर