नव्वदोत्तरी साहित्य
साहित्य जागरच्या अंकासाठी वाचलेल्या लेखाची मुळ प्रत नव्वदोत्तरी साहित्याबद्दल बोलणं म्हणजे शक्यतांच्या टोकावर आपण डगमगत असल्याची कबूली देणं आहे. या बिंदूपासून असंख्य रस्ते फुटतात , काही हमरस्त्याला मिळणारे असतील , काही अनवट पायवाटांसारखे असतील तर काही दरीच्या तळाशी पोचवणारेही असतील. मराठी साहित्य यातले कुठले रस्ते निवडेल हे सांगणं कठीण आहे. म्हणून मला आज फक्त काही शक्यता इथं मांडायच्या आहेत. मी इथे तुम्हाला विशिष्ट लेखक , पुस्तकं सुचवणार नाही , किंवा मी बऱ्या वाईटाची समिक्षाही करणार नाही. नव्वदीच्या दशकात मराठी साहित्यात जे बदल झाले ते का झाले हे जर आपल्याला शोधता आलं तर पुढे येणाऱ्या बदलांचा आपल्याला अंदाज बांधता येईल तेव्हढ्यासाठी हा प्रयत्न. सर्वसाधारणपणे नव्वदीच्या दशकाच्या अध्यातमध्यात दोन , तीन मोठे बदल घडले. आधीची दशकं गाजवणाऱ्या अनेक मराठी लेखकांचं लिहीणं उतरणीला लागलं किंवा बंद पडलं , राजकारणाचे पट नव्यानं मांडण्यात आले आणि जागतिकीकरण आपल्या घरात घुसलं. नव्वदोत्तरी साहित्याबद्दल बोलायचं तर , या बदलांना सुटं न बघता परिक्षानळीत एकत्र ओतणं आवश्यक