"मंद्र"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो
परत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण लिहीलं कुणीच नाही, कधी प्रतिसादच मुळात शुन्य, कदाचित खो खोचे विषय चुकीचे असतील, कधी वेळेचा प्रश्न असतो..काहीही असो पण ब्लॉगची सध्याची परिस्थिती भीषण आहे हे खरं. पण काही लोकांना राष्ट्रभाषेत सांगायचं तर गुडदा इ इ असतो. म्हणून परत एकदा नवा खो खो सुरु करत आहे . खो वाचा, त्याहून महत्वाचं त्यावर प्रतिक्रिया द्या आणि अजून महत्वाचं म्हणजे सहभागी व्हा . सोनुबाई आणि कथलाचा वाळा हा खो खो अश्या पुस्तकांकरिता आहे जे गाजले पण वाचल्यावर हातात भुक्कड काहीही आलं नाही . हा खो खो सुरु करताना काही साक्षात्कार झाले तेही सांगतो म्हणजे तुम्ही परत त्याच घोळात अडकणार नाहीत. हा खो खो जेनरसाठी नाही. म्हणजे आपले नेहमीचे गिऱ्हाईक वपु घ्या आणि कल्हई काढा असं इथे अभिप्रेत नाही. वपु हा एक जेनर आहे, ज्यांना ते आवडतात, त्यांना ते आवडतात. किंवा सु.शि किंवा बाबा कदम हे कसे अभिजात नाहीत यासाठी हा खो खो नाही. तुमच्या नेहमीच्या आवडीच्या किंवा गाजलेल्या लेखकाचं एखादं उगाच गाजवलेल्या