Posts

Featured Post

The Pendulum Doesn't Arrive

कसलीच हालचाल नाही अजिबात नाही गळक्या झाडांचं पानही हलत नाहीये रस्ताच्या मध्यभाग बसलेली गायही सुस्त पेंगुळलेली नाही म्हणायला भर बाजारात अश्लीलपणे उभ्या असणाऱ्या  वॉचटॉवरचा लंबक तेव्हढा डावी- उजवीकडे झुलतो आहे पण तो त्याच जागेवर कुढतोय असंही म्हणता येऊ शकतं - अगदीच शक्य आहे आपण  बुटांकडे बघायचं आकाशाकडे बघितलेलंही चालतं आकाश- राखाडी / बुट घट्ट की बुट - राखाडी/ आकाश घट्ट? मरु दे, कुणाला फ़रक पडणार आहे? आपण इथेच उभं राहायचं - वाट बघायची शू आल्यासारखे वजन या पायावरुन त्या पायावर करायचं शबनम मधलं हस्तलिखीत काढून परत आत ठेवायचं सालं काहीच बदलत नाही शबनम शबनम राहाते पाय कंबरेखाली लटकलेले राहतात रस्तापण वाढ खुंटल्यासारखा जागीच रमतो  हे बेश्ट! आपल्यालाही कुठं जायचं माहीत नसतं या रस्त्यावरुन कुणी गेलं तर काय होईल? आपल्याला बकरीसारखं त्याच्या मागे मागे जाता येईल? गेला बाजार कुणी बॉम्ब फोडला तर? कुल्ले वर करुन पळावं वाटेल - बहुदा त्या निमित्तानं का होईना काही तरी हालचाल होईल  पण तसं वाटलंच नाही तर?   शंका आणि शक्यता फार वाढायच्या आत इथून निघायला हवं निदान कुणी चार प्रश्न विचा...

मुरारीलाल

  मुरारीलाल माझ्या शहराचं आता गॉथम झालंय. फक् द बॅट लाईट ऍन्ड फक् दॅट बॅटमन. त्याच्याच नाभीतून उगवलेले गर्गरीत कोंभसले विषाणु सांस लेना भी कैसी आदत है च्या  तालावर शहरभर कदमताल करत फिरत आहेत.   चेहऱ्यावर मुखवट्याचे व्रात्य व्रण घेऊन एकट्यानेच कुढणारी माणसं आता स्वतःशीच हसायला, बोलायला लागली आहेत. खिडकीतून डोकावणारी झुम्मड गर्दी ओटीट्यांमधली बेदम नाती कॉफ्या, केक, मधाळ लसूण गॅलऱ्या, दिवे, समूहगान It is getting crazier there. हे गारुड तोडायचं तर  रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्या अनोळखी माणसाला ’मुरारीलाल’ अशी खच्चून हाक मारत  एक घट्ट मिठी मारायला हवी. स्पर्शाची व्याख्या विसरायच्या आधी एक घट्ट मिठी

देऊळ

देऊळ   मी     casual believer   आहे. म्हणजे हे माझं हे लेटेस्ट स्टेट्स आहे. मी कट्टर धार्मिक वगैरे कधीच नव्हतो पण मध्यंतरी माझं आणि देवाचं काही फारसं बरं नव्हतं. तेव्हढा एक अपवाद सोडला तर मी साधारणतः casual believer या   प्रकारात रमून गेलेलो आहे. ही जमात अमूक वारी देऊळात जाणं , तमूक उपास करणं , ढमूक मंत्र ’य’ वेळा म्हणणं अश्या   व्याखेत बसत नाही. पण हे करणाऱ्या लोकांबद्दल त्यांची तक्रारही नसते. आणि असं असूनही मला देऊळ या प्रकाराबद्दल विशेष ममत्व आहे. प्रसन्न वाटणारी , गर्दी नसलेली , जुनाट देऊळं चट्कन जाऊशी वाटतात. त्या वास्तुला काही विशेष स्ठापत्य , नदीचा शेजार किंवा दंतकथेचा काठ असावा हे जरुरी नाही. माझ्या आज्जी घरच्या देऊळाला यातलं काहीच नव्हतं. तालुक्याचा जिल्हा होऊन इतिहास झाला तरी अगदी नव्वदीच्या दशकातही लातूर फारसं बदललं नव्हतं. जुन्या लातूरमधल्या वीतभर रस्त्यावरून गर्दी वाहात सिद्धेश्वरच्या जत्रेला जायची. त्याच रस्त्यावर आज्जीचं घर आणि देऊळ होतं. ही गावातली आद्यं दैवतं. नंतर बिर्लाछापाची , समाजदैवतांची , काही ऊन-पाऊस पेलणाऱ्या भव्य मु...

नव्वदोत्तरी साहित्य

साहित्य जागरच्या अंकासाठी वाचलेल्या लेखाची मुळ प्रत नव्वदोत्तरी साहित्याबद्दल  बोलणं म्हणजे शक्यतांच्या टोकावर आपण डगमगत असल्याची कबूली देणं आहे. या बिंदूपासून असंख्य रस्ते फुटतात ,   काही हमरस्त्याला मिळणारे असतील ,   काही अनवट पायवाटांसारखे असतील तर काही दरीच्या तळाशी पोचवणारेही असतील. मराठी साहित्य यातले कुठले रस्ते निवडेल हे सांगणं कठीण आहे. म्हणून मला आज फक्त काही शक्यता इथं मांडायच्या आहेत. मी इथे तुम्हाला विशिष्ट लेखक   , पुस्तकं सुचवणार नाही ,   किंवा मी बऱ्या वाईटाची समिक्षाही करणार नाही. नव्वदीच्या दशकात मराठी साहित्यात  जे बदल झाले ते का झाले हे जर आपल्याला शोधता आलं तर पुढे येणाऱ्या बदलांचा आपल्याला अंदाज बांधता येईल तेव्हढ्यासाठी हा प्रयत्न. सर्वसाधारणपणे नव्वदीच्या दशकाच्या अध्यातमध्यात दोन ,   तीन मोठे बदल घडले. आधीची दशकं गाजवणाऱ्या अनेक मराठी लेखकांचं लिहीणं उतरणीला लागलं किंवा बंद पडलं ,   राजकारणाचे पट नव्यानं मांडण्यात आले   आणि जागतिकीकरण आपल्या घरात घुसलं.  नव्वदोत्तरी साहित्याबद्दल  बोलायचं त...

ट्युलिप्स- Sylvia Plath

ट्युलिप्स हिवाळा आला की ट्युलिप फुलणं ओघाओघानं आलंच आणि सोबत येते शुभ्रगार आसमंतात रेंगाळणारी बर्फोदास शांतता. काहीशी अशीच शांतता अंगात मुरवत मी गुमान पडून आहे न्याहाळत प्रकाशाचा एक भुरटा तुकडा भिंतीवरुन माझ्या बोटांत गुंतत जाताना. हे नक्षीकाम माझ्या हाती उगवावं असं मी काहीच केलेलं नाही. उलटपक्षी अंगावरचे कपडेही नर्सनं दिलेले आहेत आणि नावाच्या जागी लटकणारा नंबरही. मी काही विसरण्याआधी भूलतज्ञ माझा सगळा इतिहास वदवून घेतात.   चिरफाडीची वाट पाहात हॉस्पिटलच्या पलंगावर, उश्या पांघरुणाच्या गर्दीत, भिरभिरत्या डोळ्यांनी मी गुमान पडून आहे. बगळ्यांसारख्या शुभ्र गणवेशातल्या नर्स आपल्याच तंद्रीत खोलीभर फिरताहेत. किती असाव्यात तेही कळत नाही   नेमकी शीर सापडेपर्यंत त्यांचे सरावलेले हात माझ्या अंगभर फिरतात, मऊशार. आणि नंतर सुईतून ठिबकणारी झोप अनावर होत जाते. बर्फ वितळावा तश्या अदृष्य होत जातात खोलीतल्या वस्तू; माझी लेदरची बॅग, हॅट, फ्रेममधून हसणारा माझा नवरा आणि मुलगीदेखिल. सुन्न पडलेल्या शरीरावर ते हसू ओढून घ्यायला हवं!   मला आत...

निसर्गदत्त खुन्याची लक्षणे

Image

माया महा ठगनी

Image
अमेरिकेत रिसर्च स्कॉलर म्हणून काम करणाऱ्या सिद्धार्थ चक्रधरला बंदी घातलेलं स्फोटक मागवल्याच्या संशयावरुन अटक होते तेव्हा त्याची बहीण गायत्री चक्रधर या प्रकरणाचा शोध घ्यायचा ठरवते.    सिदच्या लॅबमधल्या ऍडव्हान्सड कंम्प्युटर सिस्टीम पाहून या सगळ्याच्या मुळाशी आर्टीफीशिअल इंटलीजन्सवर चालणारे बॉट्स असावेत हा गायत्रीचा निष्कर्ष सायबर गुन्हेगारी हाताळणाऱ्या एफ़बीआयच्या पॉल कार्लाला सावध करुन जातो.   बॉट्सचा बनवणाऱ्या मॅडनर्ड कंपनीपर्यंत गायत्री पोचते तेव्हा तिथे रवीकांत , स्टीव्ह आणि आशा यांच्यात सीईओच्या खुर्चीसाठी अटीतटीची शर्यत सुरु झालेली असते. मॅडनर्डमधे गायत्रीसमोर उभा राहातो तो फसवणुक , सत्ताकारण आणि तंत्रज्ञानाच्या अमर्याद शक्तीचा विचित्र खेळ.   तुमच्या आमच्या दाराशी उभं असणारं तंत्रज्ञान ज्योशुआसारख्या माणसाच्या हातात पडलं तर काय होईल ? फेसबुक आणि व्हॉट्सपवर कोंडाळं करुन राहाणाऱ्या सिदसारख्या प्रत्येकाला प्रत्यक्षातली नाती निभावता येतील ? सरतेशेवटी मशीनच जिंकतील ही गायत्रीच्या बाबाची भिती खरी ठरेल ? माणसाच्या उद्यामधे काय दडलय हे शोधायचं तर गायत्री...