ट्युलिप्स- Sylvia Plath

ट्युलिप्स


हिवाळा आला की ट्युलिप फुलणं ओघाओघानं आलंच

आणि सोबत येते

शुभ्रगार आसमंतात रेंगाळणारी बर्फोदास शांतता.

काहीशी अशीच शांतता अंगात मुरवत मी गुमान पडून आहे

न्याहाळत प्रकाशाचा एक भुरटा तुकडा भिंतीवरुन माझ्या बोटांत गुंतत जाताना.

हे नक्षीकाम माझ्या हाती उगवावं असं मी काहीच केलेलं नाही.

उलटपक्षी अंगावरचे कपडेही नर्सनं दिलेले आहेत आणि नावाच्या जागी लटकणारा नंबरही.

मी काही विसरण्याआधी भूलतज्ञ माझा सगळा इतिहास वदवून घेतात.

 
चिरफाडीची वाट पाहात

हॉस्पिटलच्या पलंगावर, उश्या पांघरुणाच्या गर्दीत,

भिरभिरत्या डोळ्यांनी मी गुमान पडून आहे.

बगळ्यांसारख्या शुभ्र गणवेशातल्या नर्स

आपल्याच तंद्रीत खोलीभर फिरताहेत.

किती असाव्यात तेही कळत नाही

 

नेमकी शीर सापडेपर्यंत

त्यांचे सरावलेले हात माझ्या अंगभर फिरतात, मऊशार.

आणि नंतर सुईतून ठिबकणारी झोप अनावर होत जाते.

बर्फ वितळावा तश्या अदृष्य होत जातात खोलीतल्या वस्तू;

माझी लेदरची बॅग, हॅट, फ्रेममधून हसणारा माझा नवरा आणि मुलगीदेखिल.

सुन्न पडलेल्या शरीरावर ते हसू ओढून घ्यायला हवं!

 

मला आता अधांतरी वाटतय, समुद्राच्या ऎन मध्यात

डळमळणाऱ्या बोटीसारखं;

सगळे किनारे दुरावलेले आणि मग तीव्रतेनं आठवत राहातात

माझी पुस्तकं, माझी खोली, चहाचा उल्हासित गंध...

पण हे सारं आता खुप मागे पडलंय

मला उगाच निःसंग नन् सारखं वाटत राहातं.

 

मला फक्त झोपायचंय, गाढ झोपायचंय.

हे रिकामपण, ही शांतता, हळुवार

माझी ओळख पुसत जात आहे.

मला आता कश्याचा मोह नाही,

फुलांचाही नाही

पण मला ती आठवतात.

दबक्या मंत्रावळीतून माझ्या डोळ्यांत ती उगवून येतात.

 

रक्तजार ट्युलिपची फुलं...

त्यांना पाहातांना माझे डोळे दुखून येतात.

कागदाच्या गुंडाळीतून त्यांचे दबके श्वासही मला ऎकू येतात.

लाल ट्युलिप आणि त्वचेवरचा लाल व्रण यांचं अनोखं अद्वैत जन्माला आलंय

आणि बघता बघता माझी त्वचा उसवून त्यातून ट्युलिपचं एक जंगलच उगवु पाहातय.

माझ्या गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या ट्युलिपच्या दांड्यांचे थंड स्पर्श मला अस्वस्थ करताहेत.
 
विलंबीत लयीतून उगवत- मावळत दिवसांमागून दिवस जाताहेत,

आता माझं पार वाळकं चिपाड झालंय.

पण माझ्याकडे कुणाचंच लक्ष नाही,

फक्त

ट्युलिपची फुलं तेव्हढी रात्रंदिवस माझ्यावर लक्ष ठेवून असतात.

त्यांचं माझ्या चेहऱ्याकडे असं टकामका बघत राहाणं मला आता अगदी असह्य झालंय.

त्यांच्या परवानगी वाचून आता इथे हवेची साधी झुळूकही वाहू शकत नाही.

त्यांनी माझ्यावर पार कब्जाच केलाय!

 

ही फुलं इथं येण्याआधी सारं कसं सुरळीत सुरु होतं.

वारा यायचा, त्याचा आवाज नव्हता- ऊन जायचं, त्याचे सोहळे नसायचे.

पण आताशा माझी खोली ट्युलिपच्या अशब्द आवाजांनी भरुन गेलेली असते.

वारा आजही येतो - मात्र ट्युलिपला वळसा घालताना

त्यांचे भवरे होतात.

माझा एकांत, माझं अधांतर, माझं झेन

उद्ध्वस्त करताहेत ही ट्युलिपची फुलं.
 
भिंतीवर, छतावर, सगळीकडे अफाट पसरलीत ही फुलं

यांना बंद केलं नाही तर एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणं

चहूबाजुंनी ही माझ्यावर तुटून पडतील.

या कल्पनेसरशी माझं तोंड खारट पडतंय,

आणि छातीत विलक्षण धडधडतंय.

ट्युलिपच्या फुलांनो

मला अजून जगायचंय, कळतंय नां तुम्हाला


(ट्युलिप्स या सिल्व्हीया प्लाथच्या कवितेचा मुक्त अनुवाद)
 
---Original Poem---
 
Tulips
By Sylvia Plath


The tulips are too excitable, it is winter here.

Look how white everything is, how quiet, how snowed-in.

I am learning peacefulness, lying by myself quietly

As the light lies on these white walls, this bed, these hands.

I am nobody; I have nothing to do with explosions.

I have given my name and my day-clothes up to the nurses

And my history to the anesthetist and my body to surgeons.

They have propped my head between the pillow and the sheet-cuff

Like an eye between two white lids that will not shut.

Stupid pupil, it has to take everything in.

The nurses pass and pass, they are no trouble,

They pass the way gulls pass inland in their white caps,

Doing things with their hands, one just the same as another,

So it is impossible to tell how many there are.

My body is a pebble to them, they tend it as water

Tends to the pebbles it must run over, smoothing them gently.

They bring me numbness in their bright needles, they bring me sleep.
Now I have lost myself I am sick of baggage——My patent leather overnight case like a black pillbox,

My husband and child smiling out of the family photo;

Their smiles catch onto my skin, little smiling hooks.

I have let things slip, a thirty-year-old cargo boat

stubbornly hanging on to my name and address.

They have swabbed me clear of my loving associations.

Scared and bare on the green plastic-pillowed trolley

I watched my teaset, my bureaus of linen, my books

Sink out of sight, and the water went over my head.

I am a nun now, I have never been so pure.
I didnt want any flowers, I only wanted


To lie with my hands turned up and be utterly empty.
How free it is, you have no idea how free——The peacefulness is so big it dazes you,

And it asks nothing, a name tag, a few trinkets.

It is what the dead close on, finally; I imagine them

Shutting their mouths on it, like a Communion tablet.

The tulips are too red in the first place, they hurt me.

Even through the gift paper I could hear them breathe

Lightly, through their white swaddlings, like an awful baby.

Their redness talks to my wound, it corresponds.

They are subtle : they seem to float, though they weigh me down,

Upsetting me with their sudden tongues and their color,

A dozen red lead sinkers round my neck.

Nobody watched me before, now I am watched.

The tulips turn to me, and the window behind me

Where once a day the light slowly widens and slowly thins,

And I see myself, flat, ridiculous, a cut-paper shadow

Between the eye of the sun and the eyes of the tulips,

And I have no face, I have wanted to efface myself.

The vivid tulips eat my oxygen.

Before they came the air was calm enough,

Coming and going, breath by breath, without any fuss.

Then the tulips filled it up like a loud noise.

Now the air snags and eddies round them the way a river

Snags and eddies round a sunken rust-red engine.

They concentrate my attention, that was happy

Playing and resting without committing itself.

The walls, also, seem to be warming themselves.

The tulips should be behind bars like dangerous animals;

They are opening like the mouth of some great African cat,

And I am aware of my heart: it opens and closes

Its bowl of red blooms out of sheer love of me.

The water I taste is warm and salt, like the sea,

And comes from a country far away as health
 

Comments