शिव्या- एक देणे!
किती थोड्या गोष्टी आहेत माणसाच्या आयुष्यात जिथे देणारा खुष असतो आणि घेणारा खल्लास! तरीही शिव्या भाषिक दृष्ट्या अस्पृश्य का? असे म्हणतात की तुम्हाला एखादी नवी भाषा किती येते याची परीक्षा घ्यायची असेल तर नव्या भाषेत शिव्या द्यायला सांगा. इतकं सारं असूनही शिव्यांना आपण सांस्कृतिक घटक मानत नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. शिव्या आणि मनुष्यप्राण्याचं वय यांच्या आंतरीक संबंधांविषयी फारसं संशोधन झालेलं नसलं तरी सांखिकीदृष्ट्या ते सिद्ध करणे फारसे कठीण नाही. उदा. तुम्ही आम्ही लहान असताना भयंकर भांडणे झाली की फार फार तर गाढव किंवा मुर्ख असे म्हणून आत्माराम शांत करायचो. नीट आठवून बघा, कॉलेजमधे या दर्जाची शिवी कधी दिली आहे का? तिथे सर्वसामान्यपणे जो उद्धार होतो तो इथे लिहीणे शिष्टसंमत होणार नाही अन्यथा मी दुर्मिळातदुर्मिळ पुण्यवचने तुम्हा सारयास ऎकविली असती. तर मुळ मुद्दा असा की कॉलेज मधे कानाखाली जाळ शिव्या काढण्या ऎवजी कुणी 'अरे गाढवा' असं म्हटलं तर किती विनोदी वाटेल? आणि कॉलेजमधली दुषणे पन्नास वर्षे वयाचा माणूस द्यायला लागला तरी आपल्या भुवया वर जातातच की. तर, पुराव्यानिशी हे सिद्ध केले ज