Posts

Showing posts from September, 2007

भंपि

भाऊ, धाडस लागतं तसले पिक्चर बघायला. कुणी ही सोम्यागोम्या नाही पाहु शकत तसले पिक्चर. अश्या विचित्र नजरेने काय बघता? आम्हाला आवडतात तसले पिक्चर. जर कुणी तन-मन-धन घालून आपल्या अंगभुत कलेचं प्रदर्शन करत असेल तर आपण प्रोत्साहन नको द्यायला? Wait a minute.. तुम्ही हे तसल्या-तसल्या शब्दा मुळे आमच्याकडे असे बघताय का? अहो मी बोलतोय मनःपुत भंकस पिक्चर्स उर्फ भंपि बद्दल... हं coming back to the point , तर आम्हाला असले (यावेळी तसले नाही)पिक्चर्स आवडतात. आम्ही त्यांना एंजॉय करतो. खरंच! आता बघा, पाथेर पांचाली किंवा जन अरण्य किंवा अपूर संसार बद्दल तुम्ही-आम्ही काय लिहिणार? म्हणजे, एक तर कळत नसताना उगीच आर्टी व्हायचं, जगातल्या कुठल्याशा भोकात बसणारा एक समिक्षक त्या पिक्चरची स्तुती करणार आणि मग आपण त्याची रि ओढायची. यात काही राम आहे का? (हा सध्या कळीचा प्रश्न आहे म्हणे). काही लोकांना आपली लायकी कबूल करणं भयंकर अपमानास्पद वाटतं पण गुरु, दिलवाले दुल्हनिया..(सुस्कारा SS ) वगैरे पब्लिक कॅटॅगरीतल्या पिक्चर्स बद्दल बोलायचं तर आपल्याला तिथं कुत्रं पण हुंगत नाही. तिथे तरण आदर्श, मसंद असले महागुणी खांब आहेत. तर

बजाव!

दे धमाल! वाजवा रे अजून जोरात वाजवा. गणपती आलान नाचून गेला. जुनं झालं म्हणता? मग? तेरा तेरा तेरा जुनून? चालेल आपल्याला काय? त्यो हलकट इलाईट क्लास विजेचं बील भरतोय की आपल्यासाठी. ते बघं, ते सोंग, छाती धरुन बसलय, दुखतं म्हणतं छातीत आवाजानं खुर्च्या ऊबवतात साले. दोन-चार दिवस आवाजाची एव्हढी भिंत नाही सहन नाही करु शकत तुम्ही? वर्षानुवर्ष दबलेला आमचा आवाज आहे समजा हा. २-४ दिवस कार नाही काढता आली तर काय झालं? रोडटॅक्स भरला तर रस्ता विकत घेतला कारे भिकारया? मंडप रस्त्यावरच लागणार. पिएमसी गेली तेल लावत. च्यायला आणि तुम्ही कोण सांगणारे मुर्ति कशी बसवायची आणि कशी उठवायची. आम्ही देवाचं आमच्या पद्धतीनं करणार. तुमचं तुमच्या पाशी. तुम्ही वर्गणि देता म्हंजे आम्हाला उपदेश करण्याचा काम नाय.कुठून पैसा कसा काढायचा माहितिय आम्हाला. श्रद्धा-बिद्धा ठिकाय पण पोरांना नाचायला मिळालं पायजेल. तुम्ही कशाला थांबलात रे? वाजवा... इथून पुढे सगळ्या जयंत्या-मयंत्या आम्ही वाजत-गाजत करणार. जिथे जिथे आम्हाला पब्लिकच्या पैशांवर, पब्लिकच्या प्रॉपर्टीवर मजा मारता येईल तिथे तिथे आम्ही आवाजाच्या भिंती उभ्या करणार, देशी विदेशी ठु

वजा लसावि

आख्खं आभाळ पेटलेलं आणि त्यात निर्वात संध्याकाळ. झटकले तरी जात नाहीत मनातुन अशुभाचे अगम्य संकेत. कवी आहे म्हणून कल्पनेचं एक टोक सतत ताणलेलंच हवं का? तेही दुखेपर्यंत? फॅक्टरीत ब्लास्ट झाल्याची बातमी ऎकल्यापासुन मी मुळातुन हललो, एक क्षणभर तुम्हीच डोळ्यासमोर आलात. कुठे असाल? कसे असाल? ओहो, प्रश्नांना नकारार्थी केलं नाही तरी मनातुन वाईट शंका जातच नाहीत. ऎन संध्याकाळी हे असले भास? देवाचा धावा करावा तर त्याच्याशी तेव्हा उभं वैर. थोडा कमीपणा घेऊन तेव्हाच त्याला साकडं घातलं असतं तर? पुढचं चित्र बदलण्याची ताकद त्यात असती, तर कदाचित तेही करुन बघायला हवं होतं. मी कवी, जगातला सर्वात शक्तिमान माणूस, पण माझीच कल्पनाशक्ती आज माझा घात करतेय. मेंदुला स्वीचऑफ बटन नसतं का? आता मला राहावतच नाही. मॉर्गला फोन लावण्याची ताकद माझ्यात नसते. शेवटची धुकधुकी जागी ठेवून मी हॉस्पिटलला फोन लावतो. "Everyone is looking for you" माझा चेहरा चमत्कारीक झाला असणार, एका क्षणात अंगातली सारी हाडं वितळून गेली, कण्यासहीत. Man is so fragile? उत्तर शोधायला वेळच नाहीए मला. तुमचा चेहरा झोपेत असल्यासारखा शांत. तुम्हाला हलवू

Mind Snatcher

श्रीरंग नटराजन उर्फ श्री हा काही फार जगावेगळा माणुस नव्हे. पण त्याच्या आयुष्यात जे झालं ते कदाचित तुम्हाला चित्तथरारक वाटू शकतं. तर मी काय सांगत होतो? हं, श्री काही फार जगावेगळा माणुस नव्हे. हिमाचलच्या कुशीत कोणत्याश्या अडनिडं नाव असणारया गावात तो राहायचा, म्हणजे तेव्हा होता. कसलसं धरण बांधण्याच्या सरकारी प्रोजेक्टवर तो आलाय. आता सरकारी कारभार म्हटलं की जो काही नैसर्गिक उशिर होऊ शकतो, तो झाल्यामुळे गेली वर्ष-दोन वर्षं तो त्या गावात होता. मुळातच बोलका स्वभाव, मदत करण्याची वृत्ती आणि मोकळा वेळ या मुळे त्या छोट्याशा गावात त्याचं बस्तान बसायला फार वेळ लागला नाही. पुढे पुढे तर त्याचं एकवेळचं जेवण कुणाच्या न कुणाच्या घरीच व्हायला लागलं. सगळ्या मित्रांना घेऊन तो कधी कधी त्याच्या रेस्टहाउसवर जमायचा, शहरातल्या गंमतीजंमती, इंजीनिअरींगच्या दिवसातले किस्से असं बरच काही चालायचं. सगळ्यांनी मिळून या अड्ड्याला क्लब असं फॅन्सी नाव ही दिलं होतं. दिवस असे बरे चालले होते. घराची फार ओढ आणि आयुष्यात फार ध्येय नसल्यानं श्री ही खुष होता. एखाद्याच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याचा एखादा पुसटसा सिग्नल आधीच मि