ट्युलिप्स- Sylvia Plath
ट्युलिप्स हिवाळा आला की ट्युलिप फुलणं ओघाओघानं आलंच आणि सोबत येते शुभ्रगार आसमंतात रेंगाळणारी बर्फोदास शांतता. काहीशी अशीच शांतता अंगात मुरवत मी गुमान पडून आहे न्याहाळत प्रकाशाचा एक भुरटा तुकडा भिंतीवरुन माझ्या बोटांत गुंतत जाताना. हे नक्षीकाम माझ्या हाती उगवावं असं मी काहीच केलेलं नाही. उलटपक्षी अंगावरचे कपडेही नर्सनं दिलेले आहेत आणि नावाच्या जागी लटकणारा नंबरही. मी काही विसरण्याआधी भूलतज्ञ माझा सगळा इतिहास वदवून घेतात. चिरफाडीची वाट पाहात हॉस्पिटलच्या पलंगावर, उश्या पांघरुणाच्या गर्दीत, भिरभिरत्या डोळ्यांनी मी गुमान पडून आहे. बगळ्यांसारख्या शुभ्र गणवेशातल्या नर्स आपल्याच तंद्रीत खोलीभर फिरताहेत. किती असाव्यात तेही कळत नाही नेमकी शीर सापडेपर्यंत त्यांचे सरावलेले हात माझ्या अंगभर फिरतात, मऊशार. आणि नंतर सुईतून ठिबकणारी झोप अनावर होत जाते. बर्फ वितळावा तश्या अदृष्य होत जातात खोलीतल्या वस्तू; माझी लेदरची बॅग, हॅट, फ्रेममधून हसणारा माझा नवरा आणि मुलगीदेखिल. सुन्न पडलेल्या शरीरावर ते हसू ओढून घ्यायला हवं! मला आत