पुरुषसुक्त: दोन टिपणे (180!)

-१-

अस्तित्वाचे अपभ्रंश सोबत घेऊन
जगताना
थकलास
तर थांब कधी माझ्या दाराशी
कवितेचे एखादे जुने कडवे
उखाण्यासारखे सामोरे घेऊन येईन मी
तर कदाचित वितळेल तुझा दगडी
चेहरा
आणि ओथंबून वाहणारया तुझ्या शब्दांना मिळेलही
अर्थाचा एखादा दृष्टांत

-२-

कोणतेही बंधन
नको असते मला
की काळाची एखादीही मेख
पण पाठीतून आरपार
जाणारा मज्जारज्जू
सतत खुपत राहातो
जसा वारयावर धावणारा अबलख अरबी घोडा
वरचेवर कुणी पेलावा
धारदार भाल्यावर

Comments

Kshipra said…
१. अस्तित्वाचे अपभ्रंश, अर्थाचा एखादा दृष्टांत ह्या कल्पना मस्तच.

२. खुपत राहतो आणि पेलणे - हे contradiction नाही झेपलं :)
"मिळेलही..." हे अगदी खरे.

तशी खात्री आता कशाचीच देता येत नाही...
क्या बात है! दोन्हीही ’सूक्ते’ चांगली जमली आहेत. :-)
Samved said…
क्षिप्रा,

त्या contradiction मुळेच तर नावात १८० टाकलं आहे! असण्याचे आणि जगण्याचे नियम इतके वेगवेगळे आहेत की इंद्रधनुष्यासारखं ताणावं लागतं काही लोकांना दोन ध्रुवांवर एकेच वेळी. असो
सर्किट, मेघना, thanks. मेघना हल्ली तू commentsही संदिग्ध देतेस. Do not attack my territory :)

Popular Posts