Tuesday, June 5, 2007

ये क्या जगह है दोस्तों...

च्यायला सगळच भोसडलेलं आहे. ऑफीसची अंतहीन कामं, एका apprisal cycle चा अंत होण्या आधी दुसरं सुरु ही झालं.. स्कोरकार्ड, रिव्हू, नवे नवे initiatives, स्वःतच्या शेपटी भोवती गोल फिरणारया कुत्र्यासारखं attrition आणि recruitment.

निवांत पेपर वाचावा तर राजस्थानातले reservation वाले दंगे. कॉंग्रेस आणि फडतूस अर्जुन आणि विपी या दोन शिंगाच्या जनावरांनी लावलेल्या आगी.

टीव्हीवर सतत गाण्याच्या स्पर्धा. डोळे आणि नरडं ताणून ओरडणारा हिमेश उर्फ टोपी. गाण्यातलं काहीही कळत नसणारी अलिशा, सगळच गोड मानून घेणारा उदीत आणि चिरकणारी टाळकी. तिसरीकडे मिचमिच्या डोळ्यांचा शान अजून डोळे बारीक करून गेल्या कित्येक शो मधे रिपीट केलेला लाल टी शर्ट घालून अमूलचं दूध पितोय.

रस्त्यावरचा महाभयंकर traffic jam आणि कुठलासा दादा-नाना-आण्णा निवडून आल्यानं "इथून धक्का तिथून धक्का मारतोस का?" ची सुरेल आरोळी. गणपती, अण्णा भाऊ ची जयंती-मयंती या सगळ्यांशी indifferent ऊषा मंगेशकर लाऊडस्पिकरच्या उंच भिंतीवर उभारुन झोकात "मुंगळा मुंगळा मै गुड की.." गाते आहे.

रस्ते पावसाळ्यात फाटणार याची झलक दिसायला लागलीय...सालं सगळंच कसं भोसडलेलं आहे इथे?

सीने में जलन आंखों में तुफ़ान सा क्यों हैं ?
इस शहर में हर शक्स परेशान सा क्यों हैं ?

दिल हैं तो, धडकने का बहाना कोई ढूंन्ढे
पत्थर की तरह बेहीस-ओ-बेजान सा क्यों हैं ?

तनहाई की ये कौनसी, मन्ज़िल हैं रफ़ीकों
ता-हद्द-ये-नजर एक बयाबान सा क्यों हैं ?

क्या कोई नयी बात नजर आती हैं हम में
आईना हमें देख के हैरान सा क्यों हैं ?

6 comments:

Meghana Bhuskute said...

का रे इतका वैतागलायस? ठीकाय... हे सगळं आहेच. पण पाऊसही आहे... असं काय... :(

Meghana said...
This comment has been removed by the author.
Meghana said...
This comment has been removed by the author.
Samved said...

होते अशी चिडचिड !! काय करणार? just imagine..कुणाची तरी मिरवणूक सुरु आहे आणि दारु पिऊन टून्न झालेली जनता रस्ता block करुन बिभत्स नाचतेय...tell me काय पावसावर काय चिडणार? पण पुण्यातले रस्ते?? गाडी रस्त्यावरुन कमी आणि खड्यातून जास्त जाते:)

Sneha Kulkarni said...

Samved, khartar aaplya moodvar pan baryach goshti asatat na. Kadhikadhi itaka mast mood asato ki khadde-paus asha goshtinch kahi vatenaasa hota.. mastpaiki mood set kar, aapoaap vaitaag nahi honaar!! :)

Anand Sarolkar said...

Hey...this is one of my favourite gazals!