उपद्व्यापी खो खो- मावशीबोलीतल्या कविता
नव्या खेळण्याचं कौतुक संपलं की ते विसरायला होतं. ब्लॉग्सचं असंच काहीसं होतय. संपलेलं नावीन्य, कामांचा तगादा, कधीमधी विषयांचा अभाव इ. इ. कारणांमुळे भलेभले ब्लॉगे गारद झाले किंवा वाटेवर आहेत तर काहींचा रायटर्स ब्लॉक संपता संपत नाहीए. फार काही सुचत नसलं की स्मरण-रंजन करावं असा विनोद मी नेहमीच करतो (आणि काही लोक तो गंभीरपणे घेऊन निव्वळ तेव्हढंच लिखाण करतात) पण आता आख्या समुद्राला उकळण्याची वेळ आली असं दिसतय. म्हणून परत एकदा खो खो चा उपद्व्याप सुरु. यावेळी खेळ आणि नियम एकदम सोपे आहेत. मराठी सोडून कुठल्याही भाषेतली तुम्हाला आवडलेली दुसऱ्या कुण्या कवीची एक कविता(/ गाणं) देवनागरीत किंवा इंग्रजीत लिहायची आणि सोबत तुम्ही त्याचं मराठीत भाषांतर करायचं. तुम्ही कवी (बाबा किंवा बाई अर्थानं)ची काही माहीती देऊ शकाल तर अजूनच मजा पण कंपलसरी नाही. शक्य झालं तर तुम्ही खो दिलेल्या ब्लॉगची लिंक या पोस्टच्या कॉमेन्टमधे टाका म्हणजे कुणी हरवणार नाही. शिट्टी फुर्र्र्र्र ******************************************************** अमृता प्रीतम नावाचं वादळ होतं. पंजाबसारख्या पाश्चात्य आचार आणि कर्मठ विचार अश्या दोन टो...