रेषेवरची अक्षरे 2010
यंदाचं रेषेवरची अक्षरेचं तिसरं वर्ष. तिसरं म्हणजे खासचं नाही? हॅट-ट्रीक, साडे माडे तीन इ इ. प्रस्तावनेतून उचलेली ही कविता आणि ही लिंक, बघा काही कुतुहल चाळवतय का...बरं वाईट जसं वाटलं तसं कळवा अंक कसा झालाय ते. आपल्याही बाब्याचं कौतूक कधी करावं म्हणून नाही, पण यंदाचा अंक मला खरंच आवडलाय... http://reshakshare.blogspot.com/ आम्ही लिहितोच आहोत पैसाच्या खांबाला टेकून किंवा गणपत वाण्याच्या बिडी बंडलाला फुंकून मुक्तपणे कधी आणि कधी प्रमाणबद्ध आकृतिबंधात. इरेस पडलों जर बच्चमजी तर आम्ही मोरूच्या बोरूनेही लिहिले असते किंवा कमळाच्या सचित्र पानांवरही. गणिताच्या वहीत मागच्या पानांवर आम्ही लिहीत होतो आणि लिहीत होतो कोसळणार्या पावसात काचेच्या तावदानावर उन्मनीपणे. आज विदेशी कळ-फलकावर मातृभाषेच्या पाऊलखुणा शोधत आम्ही लिहितोच आहोत. पण नंतर असेच झाले अट्टल कलावंताचे होते तसेच झाले प्रश्नचिन्हांनी फेर धरले आमचेच शब्द गर्गरा फिरले. अप्रकट विचार तरंगासाठी असतातच का नेमके शब्द? आणि या सांकेतिक चिन्हांतून खरंच का हो होते अर्थबांधणी? शब्दांवर शब्द रचत आमचाच अक्षर समुच्चय तेवढा भद्र आणि जन्म-मृत्यूचे दाखले, वाण्...