मुलीचे दत्तक विधान
॥ विधान १॥ ऋतुपर्ण झाडांच्या पानांमध्येच असतो पाऊस. निमित्तांचे ओलावे घेऊन गंधमग्न धारा झरझर झरतात तेव्हा झाडांचे डोळे झिम्मड होतात. पापण्या बनून पानेही समंजसपणे पावसाळ्यात आतला पाऊस मिसळून टाकतात. एका स्वरावलीवर हलकेच दुसरी स्वरावली चढवावी आणि आत्मसमर्पणाला लिरिकल सुसाईडची नवी परिणामे द्यावी तसे झाडांचे वागणे. नैमित्तिक बांधिलकी पल्याड जाऊन जंगल न्याहाळावे तर झाडे कलमही होतात अंगाखांद्यावर. आपल्या बाहेर जंगल असते आणि आता आतही. पण झाडांसारखे निश्चल नार्सिस्ट उभे ठाकू शकत नाही आपण अनंत काळ. तळपायावरचा तीळ भोवऱ्यात गरगरण्याआधी मला या जंगलातून निर्वासित व्हायचं असतं. मुलींनो, आपली ओळख नेमकी तिथली... माझ्या हाडांच्या प्रस्तरावरचे सारे संदर्भ पानांमधून झुळझुळणाऱ्या आदी संगीताचे, आकाशी मौनाच्या भाषेचे, नदीच्या निळसर अवतरणाचे. पण किती अनोळखी तुमच्या जगतातील अर्वाचिन लिपी ... शब्द शब्द अब्द अर्थ, प्रकांड विरामचिन्हे अन शुन्य निरर्थ. अंब, हाताला धरुन धान्याच्या राशीत रेखविलीस मुळाक्षरे, उरफाट्या गणितांची पाखरे, साक्षर माझे दिवस-साक्षर माझ्या रात्री. संथपणे कागदासारखे निरक्षर माझे अ...