Posts

Showing posts from January, 2015

कलावंताचं मरण

परवाच्या पेपरमध्ये पेरुमल मुरुगन नामक कुणा तामिळ लेखकाच्या मरणाची बातमी होती. लेखक हा माणूस असल्यानं तो कधी तरी मरणारंच त्यामुळे त्या बातमीत तसं विशेष काही नव्हतं. फक्त फरक इतकाचं की त्या लेखकानं स्वतःच्या मरणाची बातमी स्वतःच जाहीर केली होती, निमित्त होतं कुठल्याशा संघटनेनं जातीची बदनामी केली म्हणून त्याच्या पुस्तकाची होळी केली आणि पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी यशस्वीरित्या पदरात पाडून घेतली. त्यामुळे विषण्ण अवस्थेत त्या लेखकानं स्वतःच्या मरणाची घोषणा केली. ही फार खिन्न करणारी बातमी आहे. या बातमीच्या २-३ दिवस आधी फ्रांसमध्ये प्रेषिताची खिल्ली उडवणारी चित्रं काढली म्हणून अत्यंत निघृणपणे दिवसाढवळ्या व्यंगचित्रकारांचे मुडदे पाडले गेले आणि जगभर अस्वस्थतेची लाट पसरत गेली. कलावंताचं मरण इतकं स्वस्त असतं का? एक लिहीता माणूस म्हणून मला या आणि अश्य़ा बऱ्याच घटना अस्वस्थ करताहेत. जेव्हा एखादा कलावंत एखादी कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्याच्या अस्तित्वाचा एक तुकडा काढून तो त्या कलाकृतीत ओतत असतो. प्रतिभेच्या प्रत्येक निराकार हुंकाराला मुर्त रुप देताना, ज्या आत्मक्लेषातून, ज्या मांडणीसुत्रातू...