Posts

Showing posts from August, 2007

पत्र- अमुक आणि तमुकच्या डायरीतील काही तुटक नोंदी

आठवतं, मी किती पत्र लिहायचे तुला? कधी कधी तर दिवसातून २-२ वेळा..आणि तू निर्घृण थंडपणे एकदा विचारलस, का? पत्र म्हणजे काय औषध आहे, ठराविक वेळीच लिहायला? कुठेतरी उघडं होण्याची गरज असते माणसाला. तुला नाही कळणार.. व्हिन्सीच्या पत्रांची वाट पाहाणारा तिओ तुला आवडायचा, तू एकदा म्हणाली होतीस. तुझ्या पत्रांची वाट पाहून मी आज उंबरठ्याचाच एक भाग झालो आहे. मीही तुला आवडू शकतो नां? आपण मोठे मजेदार असतो. कधी तरी तंद्रीत, भावनेच्या भरात, बहराच्या वयात, माणूस काही तरी लिहून जातो आणि काही वर्षांनी ते बघून आपल्यालाच हसू फुटतं, कधी तर लाजही वाटते. काही काळाने, कोणत्याही संदर्भांशिवाय, त्या पत्रांचा काय अर्थ लावशील तू, याची मला चिंता नाही. माझं लिहून झालं की माझ्या पुरतं एक आवर्तन संपतं. कोणत्या भिंगातून मला बघायचं, हे तेव्हा तू ठरव. तुला तेव्हा आकाशाइतके मोठे वाटणारे प्रश्न, आज किती फुटकळ वाटतात म्हणून मी हसत नाही. त्या प्रश्नांना सोडवण्याची उर फोडणारी माझी धडपड आठवून मला हसू येतय तू कधीच पत्रांना उत्तर दिलं नाहीस..सामोरं येत राहीलास तेच न उलगडणारया प्रश्नांसारखा. तुझ्या न लिहीण्याची इतकी सवय झाली आहे की ...

ये शहर बडा पुराना है..

तुझ्या गावातील रसद संपली तसे माझ्या पुरते तुझे गाव मिटून गेले. तसे ते आवडलेही फारसे नव्हतेच; वेळ जाण्यापुरता नुस्ताच झालेला खेळ. दोन विरुद्ध ध्रुवावर एकाचवेळी तोल पेलायला मला आवडते पण तुझ्या शहरात पसरायचे झाले तर मला असंख्य धुमारे फुटण्याची अनंत काळ वाट पाहावी लागली असती. आणि काय खात्री की मला तुझ्या शहराने रुजुही दिले असते? धीर दिल्यागत मधेच माया सांगून जाते ही "ये शहर बडा पुराना है..." पण उधार शब्दांच्या बोलीवर आयुष्य पणाला लावण्याचे दिवस फार थोडे असतात. तुझ्या शहरात दिवस उजाडतो आणि एखाद्या कैद्यासारखा प्रकाशाचा किंचित तुकडा गजाआडून डोकावल्यासारखा करतो. जमावात बेभान होऊन मी ही झोकून देतो चालत्या डब्यात स्वःतला. स्वच्छ काही सुगंधी वास, काही चेहरयांवरून टपकणारा पवित्रपणा, रात्रीच्या अबोल प्रेमाचे अतृप्त काही स्पर्श आणि संध्याकाळी खिजवणारे थकेलेले घामट असंख्य स्पर्श..is it justified to overwrite my moods with that of the crowds' ? शब्दांचे तरल वृक्ष इथे सळसळत नाहीत काळीज अडकले तरी खेचत जायचे शरीराचे माजोरी साज; माझे तर सारे अंगांग विस्कटलेले.. कुत्सित हसत मी ही एक अवतरण आठ...