Friday, August 31, 2007

पत्र- अमुक आणि तमुकच्या डायरीतील काही तुटक नोंदी

आठवतं, मी किती पत्र लिहायचे तुला? कधी कधी तर दिवसातून २-२ वेळा..आणि तू निर्घृण थंडपणे एकदा विचारलस, का? पत्र म्हणजे काय औषध आहे, ठराविक वेळीच लिहायला? कुठेतरी उघडं होण्याची गरज असते माणसाला. तुला नाही कळणार..

व्हिन्सीच्या पत्रांची वाट पाहाणारा तिओ तुला आवडायचा, तू एकदा म्हणाली होतीस. तुझ्या पत्रांची वाट पाहून मी आज उंबरठ्याचाच एक भाग झालो आहे. मीही तुला आवडू शकतो नां?

आपण मोठे मजेदार असतो. कधी तरी तंद्रीत, भावनेच्या भरात, बहराच्या वयात, माणूस काही तरी लिहून जातो आणि काही वर्षांनी ते बघून आपल्यालाच हसू फुटतं, कधी तर लाजही वाटते. काही काळाने, कोणत्याही संदर्भांशिवाय, त्या पत्रांचा काय अर्थ लावशील तू, याची मला चिंता नाही. माझं लिहून झालं की माझ्या पुरतं एक आवर्तन संपतं. कोणत्या भिंगातून मला बघायचं, हे तेव्हा तू ठरव.

तुला तेव्हा आकाशाइतके मोठे वाटणारे प्रश्न, आज किती फुटकळ वाटतात म्हणून मी हसत नाही. त्या प्रश्नांना सोडवण्याची उर फोडणारी माझी धडपड आठवून मला हसू येतय

तू कधीच पत्रांना उत्तर दिलं नाहीस..सामोरं येत राहीलास तेच न उलगडणारया प्रश्नांसारखा. तुझ्या न लिहीण्याची इतकी सवय झाली आहे की कधी तू लिहीशिल तर तुझ्या अक्षरांची भुमिती मी ओळखु नाही शकणार

तुझ्या गुपितांची तुला मोठी काळजी होती. किती विश्वासानं तू लिहीलस सारं..मी ही सारं लिहायलाच हवं होतं का? असो. तुझी सारी पत्रं, तुझ्या मागोमाग अग्नीच्या स्वाधीन केलीत मी. तुला कदाचित कळणार नाही (असंच म्हणायचीस नां तू?)

...


मला हल्ली एकाकी पणाची सवय झाली आहे. Rather कुणी येण्याचीच इतकी भयंकर भिती वाटते की रोज कावळा बसायचा ती तारही मी अशात उतरवून टाकली आहे.

सावित्री- "नाचावसं वाटलं की आपणच मोर व्हावं." पत्र वाचावं वाटलं की आपणच पत्र लिहावं?

14 comments:

Meghana said...

mi ekda ardhavat kapat aavarun baher gele hote aani dada sagala pasara aat theun dyayala lagale hote tyana tyat mazi ek choti diary sapadali tyat lihila hota-mala suiside karavi vatatey....mi ghari yeiparyant dadanchya jivat jeev navata...aani ghari aalyavar sagala aikun mala itaka hasu yet hota....kadhi lihun thevala hota te pan aathvat navata...kharach
आपण मोठे मजेदार असतो. कधी तरी तंद्रीत, भावनेच्या भरात, बहराच्या वयात, माणूस काही तरी लिहून जातो आणि काही वर्षांनी ते बघून आपल्यालाच हसू फुटतं, कधी तर लाजही वाटते..patatay he....aani by the way honestly bakicha sagala dokyavarun gelela aahe

Meghana Bhuskute said...

फारच इण्टेन्स, पण काहीसं सुरू होता होता संपून गेल्यासारखं वाटतंय. अधिक लिहिण्याचा मोह टाळणं बरोबर. पण ती काळजी घेण्याच्या नादात हे जरा त्रोटक झालंय... नीट-तब्बेतीत, पुरा न्याय देऊन लिहिलं असतंस, तर काय वाचायला मिळालं असतं, अशी चुटपुट लागतेय...

Anonymous said...

जे आपल्याला आवडते ते इतरांपर्यंत पोहचले पाहीजे .
असा लहानसा प्रयत्न आहे.म्हणूनच मला वाटते .
की तू सूद्धा आमच्या अड्डयात सामील व्हावे .
एकदा येऊन पहा आमच्या ब्लोग अड्डयावर

Sumedha said...

(दोन्ही) मेघनाशी सहमत! हे बरं आहे न, अगदी सावध, कुठली जबाबदारी न घेणारा प्रतिसाद :) आणि हो, खोड (आणि खोडच) चांगली आहे ;)

Anamika said...

surekh bhavapoorNa lihilayet.. yogya thikani aaNun thambavalaye.. vachaNaryane swat:shi identify karun pahava, ani hava tevadha artha ghyava. :-)
good!

Monsieur K said...

>> तुझ्या पत्रांची वाट पाहून मी आज उंबरठ्याचाच एक भाग झालो आहे.
....
>> तुला कदाचित कळणार नाही (असंच म्हणायचीस नां तू?)
....
सावित्री- "नाचावसं वाटलं की आपणच मोर व्हावं." पत्र वाचावं वाटलं की आपणच पत्र लिहावं?

Samved,
apratim lihila aahes. it might appear short as ppl have pointed out... but it suits the format.. a format that has only excerpts from a diary...

a Sane man said...

सुरेख. खूप प्रभावी मांडणी झाली आहे. एवढ्या प्रभावी लिखाणाला ओळींचे हिशेब कशाला? मला माहित नाही. मला आहे तस्संच खूप आवडलं.

Rohit said...

why sad? why is had to end on sad note? किती छान चालू होत्या डायरींच्या गप्पा!

Meghana Bhuskute said...

तू ’एम. टी. आयवा मारू’वर लिहिणार होतास. ते लिहीत नाहीस तोपर्यंत मी कटकट करत राहणार...

mad-z said...

संव्या, ही पत्र कुणाची? तुझी की आणखी कुणाची. संदर्भ लागला नाही म्हणून विचारलं.

तसं तू म्हणतोस ते खरंच आहे. वेळेसोबत माणूस बदलतो, त्याच्या सोबत त्याचे विचार. आणि म्हणूनच हे उद्याचं लाजणं किंवा हसणं आलं.

Samved said...

Meghan, I am yet to gathercourage to write about MTIM. It's a bit ticket item and if I miss by chance, people like you will kill me for good:)
Dinya, you didn't understand post at all, leave it..

Meghana Bhuskute said...

तुझ्यासारखा माणूस मरणाला घाबरतो की काय?! भिड ले भिडू.... तू नाही तर कोण लिहिणार आयवा मारूवर? तू नाहीतर बाठेसाहेब. बाठेंनी सध्या मौन स्वीकारलंय.. आणि शिवाय तू लिहिणार म्हणाला होतास. आता कसं पळून चालेल?!!! आयवा मारू, रणांगण, नातिचरामि.... अहाहा... कल्पनेनंच मजा येतेय... लिही लवकर. भाव नको खाऊस.

mad-z said...

आरे हो नाही समजलं हे तर नक्की. पण मग समजावून दे ना. की असाच ढकलणार तू मला पुढे.

Meghana said...

sami,kharach lihi,nusata aayava maru ch nahi tar samantanchya jamtil tevdhya pustakanvar lihi...aani ranangan var tar tu zopet pan lihu shakato yavar mazi khatri aahe,karan dada MA la shikavat hote he pustak tenva roz dining table var tich charcha asayachi....so aata jara laukar yeu dya ki navin post....ajun tula lihinyasarakhe kiti vishay aahet...u know that...