भंपि
भाऊ, धाडस लागतं तसले पिक्चर बघायला. कुणी ही सोम्यागोम्या नाही पाहु शकत तसले पिक्चर. अश्या विचित्र नजरेने काय बघता? आम्हाला आवडतात तसले पिक्चर. जर कुणी तन-मन-धन घालून आपल्या अंगभुत कलेचं प्रदर्शन करत असेल तर आपण प्रोत्साहन नको द्यायला? Wait a minute.. तुम्ही हे तसल्या-तसल्या शब्दा मुळे आमच्याकडे असे बघताय का? अहो मी बोलतोय मनःपुत भंकस पिक्चर्स उर्फ भंपि बद्दल... हं coming back to the point , तर आम्हाला असले (यावेळी तसले नाही)पिक्चर्स आवडतात. आम्ही त्यांना एंजॉय करतो. खरंच! आता बघा, पाथेर पांचाली किंवा जन अरण्य किंवा अपूर संसार बद्दल तुम्ही-आम्ही काय लिहिणार? म्हणजे, एक तर कळत नसताना उगीच आर्टी व्हायचं, जगातल्या कुठल्याशा भोकात बसणारा एक समिक्षक त्या पिक्चरची स्तुती करणार आणि मग आपण त्याची रि ओढायची. यात काही राम आहे का? (हा सध्या कळीचा प्रश्न आहे म्हणे). काही लोकांना आपली लायकी कबूल करणं भयंकर अपमानास्पद वाटतं पण गुरु, दिलवाले दुल्हनिया..(सुस्कारा SS ) वगैरे पब्लिक कॅटॅगरीतल्या पिक्चर्स बद्दल बोलायचं तर आपल्याला तिथं कुत्रं पण हुंगत नाही. तिथे तरण आदर्श, मसंद असले महागुणी खांब आहेत. तर ...