रंग
रंगावरुन मनाच्या तळाचे कंगोरे सांगणारा भविष्यवेत्ता भेटला होता मला एकदा. "बोल काय सांगु तुला? भुतकाळातली भुतं की वर्तमानाचे वर्तमान? म्हणत असशिल तर भविष्याचे आरसे आत्ताच दाखवीन उलगडून. ओळखशील स्वतःला आत्ताच, तर सावरशील कदाचित काळाच्या एखाद्या निसरड्या क्षणावर. मनापासुन ऎकशील तर कदाचित फायद्यात राहाशील नाहीतर थोडीशी गंमत समज आणि विसरुन जा" सुर्याची कुळं आणि चंद्राची मुळं खणून भविष्य वर्तवणारी असंख्य बिनचेहरयाची माणसे मी पाहीली होती. हातांवरच्या रेषात भुत-भविष्य शोधत हरवलेली माणसेही माझ्या पाहाण्यात होती. पण निसर्गाच्या अंगांगात भिनलेल्या रंगांचे, त्यांच्या अनंत छटांचे विलगिकरण करु पाहणारा हा पहिलाच. संधीला पंख असतात वायुचे, अशब्दाचे तीव्र कान आणि मौनाची बेजोड भाषा. "निळा" मी माझ्याच नकळत बोलता झालो. "विशाल! बच्चा, मोठं मन, मोठे विचार...आकाशाची भव्यता- सागराची खोली लाभली आहे तुझ्या आवडीला" निळ्या रंगाच्या अनंत छटा माझ्या डोळ्यां समोर तरळत राहिल्या. उत्तरे नसतातच, प्रश्नांचेच छंद होऊ पाहाताहेत आता. "बाबजी, पिवळा रंग? बुद्धाची करुणा आणि ऍनचं एकाकी पण दिसत...