Tuesday, October 23, 2007

विदुषक

विदुषकाने एकदा त्याच्या दुखरया पायाकडे आणि नंतर लग्नाचं वय उलटून गेलेल्या त्याच्या मुलीकडे आणि निठल्ल्या, निकम्म्या मुलाकडे अनुक्रमे हताशपणे आणि तिरस्काराने पाहीलं. "या पोरानं काही उद्योगधंदा केला असता तर आज हा मोडका पाय घेऊन नाचावं लागलं नसतं, ना या पोरीच्या लग्नाची चिंता करावी लागली असती" विदुषकानं मनातल्या मनात विचार केला "आणि हो, त्या नव्या बेरकी मॅनेजरची बोलणीही खावी नस्ती लागली." मॅनेजरच्या आठवणीने विदुषक कसानुसा झाला. गेल्या काही महिन्यांपासुन त्याचं वय जाणवत होतं आणि सर्कसच्या त्या छोट्या तंबुचे नियम मोठे स्पष्ट होते; लंगड्या घोड्यांना तिथे जागाच नव्हती. विदुषकाला तरीही खात्री होती की या नव्या जमान्यात सर्कसला कोणी दुसरा जोकर सापडणार नाही. शिवाय त्यानं आज लंगड्या पायांनी मारलेल्या बेडूक उड्यांनाही पब्लीक बरं हसलं होतं. आजचा शो आठवून विदुषकाला जरा धीर आला आणि पायाचं दुखणं मागे सारुन त्यानं मॅनेजरच्या तंबुचा रस्ता धरला. "कदाचित येव्हढ्या वर्षांची सेवा आणि जुने दिवस आठवून देणारा आजचा परफॉर्मन्स, या बळावर एक जीर्ण पगार वाढ!" विदुषकाचं पायाचं दुखणं कुठल्या कुठे पळून गेलं आणि एक पाय खुरडत तो नव्या उत्साहाने मॅनेजरच्या तंबुत घुसला.

"तू आता मुक्त आहेस"

विदुषकाला कुणीतरी थोबाडीत मारल्यासारखं वाटलं. "मुक्तं?" विदुषकानं हा शब्द परत परत उच्चारुन बघितला पण त्याला काहीच अर्थबोध होत नव्हता. आपल्या पायात नक्की खिळा घुसला होता की कुणी आत्ताच आपल्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेतल्या हे न समजल्यामुळे विदुषक हातांच्या भारावर भराभर उड्या मारत तंबुत परतला, नेहमीच्या सवयीनं.
विदुषक सतराशेचौदाव्यांदा तोंड घासून बघतो. त्याच्या चेहरयावर चढलेली रंगाची पुटं उतरत नसतात. दोन्ही हातांनी गच्च धरुन आता तो चेहरा उपटण्याचे प्रयत्न करत असतो.


नव्या नव्या उत्साहात, विदुषकाचा निकम्मा मुलगा रंगीबेरंगी कपडे घालून, नाकावर लाल रंगाचा बॉल ठोकून बसवत असतो.


अंगावर फक्त रात्र ओढून, विदुषकाची मुलगी, बेरकी मॅनेजरची आतुरतेने वाट बघत असते.

4 comments:

Meghana Bhuskute said...

to be very frank, one can guess the end. 'angawar fakt ratr odhun' hee pratima matr afalaatoon class. baki... better luck next time. :(

a Sane man said...

हातावर वाफ यावी नि एकदम...स्स्स्स्....चटका लागावा तसं वाटलं शेवटचं वाक्य वाचलं तेव्हा....दुःखद सुरेख...

Anand Sarolkar said...

Ya adhicha post ekdum aakash ani he mahnje agdi paataal.

Complete contrast!

mad-z said...

Dont want to discourage ... I cant do that to anyone ... but मागल्या वेळी तूच म्हणालास की writer blockच्या फेजमधली काही लिखाणं माणासानं स्वतः पुरती ठेवावी ... हे कदाचीत त्यातलंच नाही का.

आय मीन, शब्दनिवड आणि वाक्यं नेहमीच्याच उंचीची पण कथेची पातळी ती उंची नाही गाठू शकली. may be coz you made it too short or may be coz you did want to go in detail ... or just may be you wrote it coz you wanted to pen down.

Anyway, नॉट बॅड अफ़्टरऑल. जगात असे किती विदुषक असतील याची कल्पना नसेल आपल्याला. मी स्वतः पाहीलेत ... त्या प्रत्येकाची एक पोरगी नाहीये ... पण हे असे निठ्ठले सुपुत्र मात्र नक्कीच आहेत.

असो. मला वाटतं स्वतःच्या पोराला खांदा द्यावा लागणं हे एखाद्या बापाच्या वाट्याला येणारं सर्वात मोठ्ठ दुख्ख असेल. पण किंबहूना असा एखादा असा निठ्ठला असणं हे कदाचीत स्वतःला खांदा देण्यासारखं आहे. I am happy to be proud son and a proud father.