जेजुरी

माझ्या अहंकाराचे टोक
प्रतिभेच्या बेचक्यातुन बाहेर येण्याआधी
तुझा गोंधळ मांडु दे जेजुरी
काट्याने कधी कोरावेच वाटले नाहीत तुझे डोळे अगणित
डोळस तुझा उदे उदे उदे


अंगांना प्रत्यांगे असतात,
आतल्या बाजुने,
कळवण्यासाठी उसवुनच टाकलेस त्वचेचे
नाजुक कोवळे पोत,
काही सिद्ध करण्याचे कसले हे उरफाटे हट्ट जेजुरी
आत्म्याच्या संपृप्ततेला आव्हान देणारी
शरीराची भाषा वसतीला आणलीस आणि सोबत माझ्या
मर्त्यपणाचे अगणित पुरावे


भरभरुन उधळु दे हळदीचे रान
जेजुरी,
माझं माणुसपण सिद्ध केलस
चल आता
उपभोगाचे उत्सव साजरे करु

शेज पिवळी-देह पिवळा
गंध तुझा मंद पिवळा
श्वास पिवळे-रात पिवळी
अंगावरचे बहरही पिवळे
उरी फुटणारे वारे पिवळे
तुझ्या देही जिरवले चंद्र
ते ही मद्द संथ पिवळे


जेजुरी, माझ्या डोळ्यातील उखाणे
तुझ्या देहावर कवितेगत उतरले तेव्हा काय झालं?
भंडारयाचं धुकं झालं
दिवसांनं सोनं न्यालं
रिकामं शहर वसतीला घेऊन
अक्षर न अक्षर जेजुरी झालं


आत्मभानाचे स्र्किझोफेनिक दुसरं टोकं
जेजुरी
बोटांनी अंगावर नव्याने कोरलेल्या जुन्याच कविता
जेजुरी
आत्मद्वेषाचे आणि अहंकाराचे उत्सव
जेजुरी
सवयीने मी
जेजुरी

Comments

Megha said…
tumha saglyana nakki zalay tari kay? to abhijit bathe tikade jay malhar kartoy,tu ikade jejuri karat aahes.....nemaka kay challay te tari kalu de...
Samved said…
Frankly speaking, I was not expecting any comment. I thought it's too personal (and what about 'more I become personal, more I become universal'?)
First thing first, अभिजीतचं पोस्ट आणि हे, यात कसलाच संबंध नाहीए. अर्थात हे माझं मत झालं! अभिजीतच्या आणि या पोस्ट मधे एक गोष्ट common असलीच तर ती म्हणजे both talk about some feminine influence on life.

I was trying to portray, a unique journey from स्वरुप ते अरुप. गुलजारचं "बोल ना हलके हलके (झुम बराबर..[मला खरंच तो सिनेमा आवडला!])ऎकलस का? खरं तर त्या गाण्यातली haunting melody, was the initial inspiration behind this poem (or whatever)
आता म्हणु नकोस की मी तुला काही सांगत नाही :)
Tulip said…
अप्रतिम लिहिलं आहेस संवेद. खरंतर आधी एकदा वाचलं हे त्यावेळी नामसाधर्म्यामुळे कोलटकरांची जेजुरी डोक्यात ठेऊन वाचलं गेलं आणि काही उतरलच नाही आत. पण आत्ता तु हे वर लिहिलेल्या संदर्भात वाचल्यावर इतकं आवडलय की काटाच आला अंगावर:D