"खुप खुप काम केलं की काय होतं म्हाराजा?" "दमायला होतं पण मज्जा येते बुवा" "म्हाराजा, षडरिपुंबद्दल नाही, आपण हापिसाबद्दल बोलत आहोत. आता परत सांगा, खुप खुप हापिस केलं की काय होतं म्हाराजा?" "बुवा, तुमी तर लाजिवलंच पार. हापिस करुन कुणाला काय मजा येते व्हय? पण त्यातुन काय कुणाची सुटका नाही बघा बुवा" "म्हाराजा, विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचाच्या पापात अडकलेले. त्यांनी या हापिसाच्या व्यापातुन वेळ काढून मोक्षाच्या दिशेने कशी वाटचाल केली याची ऎका ही गोष्ट" "जी बुवा" "विनु-मिनु सख्खे शेजारी. आटपाट नगरात त्यांचं देवाच्या दयेने उत्तम सुरु होतं. देवासमोर जसा नंदादिप जळत असतो तसे ते हापिसात जळायचे. त्याला आंग्लभाषेत बर्नाआऊट म्हणतात. दिव्यातलं तेल जसं कमी झालं तसं त्यांनी देव-भुमीला सहल काढायची ठरवली." "बुवा , म्हन्जे स्वर्गात?" "म्हाराजा, काय हे अज्ञान...तुम्ही सुखी होण्याची पहीली पायरी म्हणून जरा टीव्ही पाहात चला म्हाराजा. टिव्ही पाहाताना डोळे दिपून जातात. डोकं कसं सुन्न होऊन जातं. खाण्यापिण्याची शुद्ध राहात ना...