आवडलेले थोडे काही

मित्रांनो, खुप दिवसांनी एक नवा खो-खो सुरु करतोय. विषय तसा बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा आहे त्यामुळे मझा यावा हीच (श्रींची!) ईच्छा.

कविता जश्या बालभारतीच्या तावडीतुन मुक्त झाल्या, तुम्हा-आम्हाला त्या (अचानकच?) आवडायला लागल्या. त्या आवडीनिवडीतही जिवाच्या जवळ असणारया काही कविता असतातच. हा खो खो अश्याच कवितांसाठी.

यावेळी खेळाचे नियम जssरा बदलतोय.

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही

५. अजून नियम नाहीत :)

--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- -----------------------

सखीची मुलगी- कवी ग्रेस (निवडक कडवी)

सखीच्या मुलीला कसे काय द्यावे
उन्हांतील हे भव्य शब्दांगण?
इथे चंद्र नाही इथे सूर्य येतो
स्वतः सावलीचा मुका साजण...

जळातील चांदीत मासा रडावा
तसा मेघ येतो सखीच्या घरी
घराच्या भयाने उभा श्वास तोलून
धरावी मुलीने पुन्हा बासरी?

तिने जीव द्यावा असा जीव न्यावा
पुढे सर्व हो कांचनाचे धुके
लिलावात वाटणे संभवे ना
अशाने सखीला कधी पोरके.

--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- -----------------------

दु:ख- कवी ग्रेस

//१//
निर्वंश समुद्रावरील वाळवंटात उभे
राहिले की मला ऎकू येतात
माझ्या कविता.
एखाद्या प्राचीन साम्राज्याचा निखालसपणे
खचलेला भूभाग.
मावळत्या मिठीतील काळा करंद मोर...
दुःख सांगितले की हलके होते.
आकर्षक होते जगून दाखविले की.
मरुन दाखवल्यावर
दुःख मिटते?

//२//
स्वप्नलिपी वाचणारया प्रेषिताच्या खांद्यावरुन
ढळलेला पक्षी थेट पडला
तो काळोखातच.
डहाळ्यांवर फार दिवसांच्या सुकलेल्या
चांदण्यांचे तेजस्वी व्रण होतेच.
आणि मग उशीरा रात्रीपर्यंत शहरातून
निर्घूण कत्तलीच्या बातम्या
येतच राहिल्या.

//३//
आवड तरी कशी? दुःखद नक्षीची कविता,
प्रिय व्यक्तीचे प्रदीर्घ चुंबन;
ज्या खेड्यांत प्रार्थना भरत होती
तिथल्या विहिरीचे काळे पाणी;
उशीर झाला म्हणून लिलावात विकलेले
घर. मनाचे आणखी कोणते धर्म असतात?
रडून थकले की सगळेच जीव झोपी जातात.


--------------------------- XXXXXXXXXXXXXXX- ---------

माझा खो मेघना आणि क्षिप्राला...

Comments

'खो' घेतला आहे. लिवते...
Anand Sarolkar said…
mast ahe kho-kho chi idea :)
Samved said…
Thanks Meghana

आनंद, अरे ही आयडीया नक्की कुणाची आहे माहीत नाही पण आहे बरया पैकी जुनी आणि मस्त!!
a Sane man said…
dusari kavita (tinahi bhag) vishesh aawadale...nice..
Samved said…
Yes Sane...reflects the sensitivity of an artiest
कवितांच्या खो च्या आयडियेची कल्पना एकदम सही!! शंभरात एकशे दहा मार्क्स तुला!! :) ह्या कल्पनेबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल आभार :) आणि त्यात आता मला खो मिळाल्याने माझा आनंद अजूनच द्विगुणित झालाय!! :D
पण असे जाचक नियम का तयार करतोस ब्वॉ??? :D
छान कल्पना आहे. मला ख़ो मिळालेला नाही. पन मला सहभागी व्हायला आवडेल.