Sunday, September 7, 2008

किनारे

सखीचे किनारे
असे पावसाळी
जसा बुद्ध
डोळ्यातुनी हासला

कुठे नीज तारे
कुठे शुभ्र अश्व
तुझा थेंब थेंब
देह चित्रावणे

विरक्तात का रे
नभांचे आरक्त
आणि पावसाळाही
ओला झरे

सखीचे किनारे
असे भासशाली
जणू श्वास
श्वासातुनी वाकले

8 comments:

यशोधरा said...

विरक्तात का रे
नभांचे आरक्त
आणि पावसाळाही
ओला झरे

aha! surekh!

Abhijit Bathe said...

Did you write this poem?

Abhijit Bathe said...

या आधीच्या कमेंटवर तुझी प्रतिक्रिया यायच्या आधीच मी गोत्यात आलोय.
एक म्हणजे - अशी प्रतिक्रिया लिहिणं म्हणजे आरोप करण्यासारखं झालं.
दुसरं म्हणजे - तुझ्या चांगल्या कविता लिहिण्याच्या कुवतेबद्दल शंका उपस्थित करण्यासारखं झालं.
तर गैरसमज व्हायच्या आधीच स्पष्टीकरण - कविता चांगली आहे.

पण तरीही प्रश्न - तु लिहिलिएस?

Samved said...

हो, अभिजीत, तरीही प्रश्नाचा रोख कळालेला नाहीच

Megha said...

सखीचे किनारे
असे भासशाली
जणू श्वास
श्वासातुनी वाकले
surekh!!!!

a Sane man said...

I am not sure how I missed this..paN aaj ya divsanni vachtoy...

"सखीचे किनारे
असे पावसाळी
जसा बुद्ध
डोळ्यातुनी हासला"...bhaarii!

Anonymous said...

सखीचे किनारे
असे पावसाळी
जसा बुद्ध
डोळ्यातुनी हासला

केवळ अप्रतिम !!

अनामिक मेघवेडा... said...

सुंदर...
सखीचे किनारे असे पावसाळी
जसा बुद्ध डोळ्यातुनी हासला.

हि ओळ डोकयात घर करुन बसली आहे...