इडिपसाचे किंचित जुने वर्तमान


स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. नाटकाच्या वाचनाला स्टेजचा हट्ट करण्याची दोन कारणं; नाटक ही केवळ गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे ही दृष्टी आणि स्टेजचं असणं. तर, स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. अंड्यातल्या बलकासारखा कोवळा पिवळसर प्रकाश मध्याभागी ठेवलेल्या ३-४ खुर्च्यांवरुन ओसांडून वाहात असतो आणि अंधाराचं एक टोक पकडून मी स्टेजच्या एका कोपरयात बसलेलो. अंधाराचा अवकाश मोठा सुखद असतो. शरीराचे निर्बुद्ध प्रतल कुणाला वाचता येत नाही की डोळ्यांमधून उमटणारे अर्थांचे नाचरे बेबंद मोर कैद करावे लागत नाहीत. आरसा देखील झाकावा लागत नाही अस्सं माहेर भेटतं अंधाराच्या कुशीत. अंधाराच्या पल्याड अजून थोडा अंधार असावा तशी तू गर्द काळी शाल पांघरुन विरुद्ध अर्थाच्या कोपरयात बसलेलीस. काय करत असावीस? अनंत रिकामेपणात वैयक्तिक रिकामेपण मिसळलं की सीनर्जी होत असेल का निर्माण? कठीणपणे लपत होतं तुझं लख्ख लावण्य त्या काळ्या शालीत आणि तसे तुझे अट्टहासही नसावेत बहूदा. मी तुला निरपेक्षपणे पाहात राहातो.

समाधी मोडते कारण नाटकाचं वाचन सुरु होतं; राजा इडिपस!

इडिपस, लुई, जोकास्टा सारे पुस्तकातून जीवंत होताहेत. इडिपसाची शतकांवर पसरलेली शोकांतिका! जन्मजात अनैसर्गिक अशुभांचे भाकीत, बापाचा खुन, स्वतःच्याच आईशी लग्न, आणि शेवटी स्वतःचे डोळे फोडून परागंदा होणं ही थोडक्यात नाटकाची कथा. कथे पलीकडे जाऊन इडिपसाचे मानसशास्त्रीय, सामाजिक अर्थ शोधणं असा काहीसा प्रयत्न करायचा म्हणून संशोधकाच्या भुमिकेत मी. पण जिथे लिहीणं थांबतं तिथून पुढंच नाटक खरं उलगडत नेतो बाबा. बाबा म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक.

बाबा स्वतःच इडिपसचे संवाद म्हणतोय. खर्जातल्या संथ कवितेसारख्या त्याच्या ओळी ऐकून संध्याकाळची भानामतीच होते...


"Aye, 'tis no secret. Loxias once foretold

That I should mate with mine own mother, and shed

With my own hands the blood of my own sire.

Hence Corinth was for many a year to me

A home distant; and I trove abroad,

But missed the sweetest sight, my parents' face."

टोकाच्या भावना पिढीच्या अंतराने उमटाव्यात तितपतच दबका हुंदका तुझ्या कोपरयातून आला पण माझे सारे तळ ढवळुन निघाले. बाबाला त्याची ऍन्टीगोनी मिळाली.

एखादं पात्र डेव्हलप करायचं म्हणजे ते पात्र वर्तमानात काय आहे या पेक्षा ते भविष्यात कसं असेल याचा विचार करायचा. बाबा फार छान प्रकारे सांगतो हे सारं समजावुन.

"मला वाटतं मी बाबाच्या प्रेमात पडलेय", समेवर आल्यागत तू म्हणालीस. दचकायचं नाही ठरवुन देखील मी दचकतो. "वयाच्या अंतराचं काही नाही. इडिपसचा कॉम्प्लेक्स उलटा झालाय समज. ऍन्टीगोनी इज इन लव्ह विथ इडिपस" बाबाला ऍन्टीगोनीचं पात्र असं डेव्हलप व्हावं असं कधीच वाटलं नसेल. नियती, अजाणतेपणी झालेलं पाप इ.इ. सारी कारणं देऊन मी थकलेलो असताना तुझा विमुक्त सवाल "तुला नाही आवडत मी?"

"तुला नाही आवडत ती?" बाबानी पुस्तकातुन डोक वर न करताच माझ्यात आरपार प्रश्नचिन्ह घुसवलं.

"मी खुप आळशी आहे" शहराला टाळून बाहेरुन जाणारया रिंगरुट सारखं माझं उत्तर. पात्रं जितकी अमुर्त, तितकी त्यातुन अर्थ सापडण्याची शक्यता जास्त.

बाबा सवय असल्यागत बोलतो "माझ्या वयाच्या किंचितही इंटलॅक्युअल माणसाच्या प्रेमात वीस-बावीस वर्षाच्या मुलीनं पडणं हे खुपच नैसर्गिक आहे. पण मेंदु आणि शरीराच्या गरजा प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या असतात. या दोन वेगळ्या गरजा एकत्र येतीलच याची खात्री किंवा अट्टहास का? आणि बाय द वे, ऍन्टीगोनी कॅन नॉट लव्ह इडिपस. ऍन्टीगोनीचे पात्र असं डेव्हलप होऊच शकत नाही फॉर द नोन रिझन्स. केवळ तुला लेखक म्हणून या चाळ्याचा एक खेळ करायचा असेल तर गोष्ट वेगळी. फक्त रुबीक क्युबच्या एका बाजुचे रंग जमवताना बाकीच्या पाच बाजु फिस्कटवु नकोस म्हणजे झालं"

"बाबा" मी निरुत्तर अवस्थेत वाद घालतात तसं बोलत राहातो " कधी नाटककाराला शोधत पात्र येतात. पण त्या पात्रांच्या त्वचेखाली हाडांमासांचा जो जीवंत माणूस असतो, तो फक्त तुला, एक दिग्दर्शक म्हणून, भेटु शकतो, मला नाही. ऍन्टीगोनीचे रंग उतरवल्यावर ती जी काही शिल्लक राहाते, तो जीव तुझ्यात गुंतलाय. त्याचं काय?"

पुर्णविरामाचं निश्चयी बळ पुरवत बाबानं भरतवाक्य उच्चारलं " जोकास्टाचा ब्रोश, कधी नैतिक, कधी सामाजिक आणि कधी अनुवंशीय अधिष्ठान बनतो. विविध कालात इडिपसाने स्वतःचे डोळे त्या ब्रोशने फोडून घेणं ही नियती आणि अपरिहार्यता देखील."

"Let the storm burst, my fixed resolve still holds,

To learn my lineage, be it ne'er so low.

It may be she with all a woman's pride

Thinks scorn of my base parentage. But I

Who rank myself as Fortune's favorite child,

The giver of good gifts, shall not be shamed.

She is my mother and the changing moons

My brethren, and with them I wax and wane.

Thus sprung why should I fear to trace my birth?

Nothing can make me other than I am."


Comments

WOW!! Educating Rita, Aatmakatha(Elkunchavar) looked in the background of Eodipus!!
very sensitive and just wow!!
Anand Sarolkar said…
>>> अनंत रिकामेपणात वैयक्तिक रिकामेपण मिसळलं की सीनर्जी होत असेल का निर्माण?

Kay sahee prashn ahe ha! :D
Tulip said…
सु-रे-ख!
Jaswandi said…
mastch! mhanaje mala nakki nahi sangta yete kay vattay te..pan mastch!
Monsieur K said…
Antigone falling for Oedipus??
- interesting thought - was reminded of a book and a movie - the book's called 'The Interpretation of Murder' - was one of the bestsellers in US in 2006, which used the concept based on the Oedipus Complex as its plot; and the movie's none other than Lamhe...

but i'm not convinced abt Antigone falling for Oedipus - Oedipus married his mother not knowing how they were related.. whereas Antigone's aware of her relation..

maybe, that's why u used the Rubik cube analogy...

phaar-ch gahan arthaach lihitos rey tu.. mala purn-pane samajlay ki naahi.. not quite sure :)
Yogesh said…
संवेद,

झकास. पण एकच तक्रार. फार कमी लिहिलंस. :)

जीएंचे (इथे दोन्ही कानाच्या पाळ्यांना स्पर्श) 'ऑर्फियस' वाचले असेलच. मला वाटले तशी एखादी मोठी कथा लिहिली आहेस.

तुझ्या ह्या लेखनाला थोडा संथपणा असता तर किती झकास झाला असता. हा लेख तंबाखू मळून तोंडात टाकायच्या आधीच संपला.

पण विशेषणं फार चांगली आणि वेगळी वापरली आहेस. पहिला पॅरा फारच सुंदर.

राग मानणार नसलास तर एक विनंतीः
मध्याभागी, ओसांडून असे दाताखाली येणारे खडे नकोत.
Megha said…
chaan lihila aahes....sandarbha pan kalale chakka....aai la itkach vicharala ki antigony madhe kaam kuni kela hota? pan aai mhanate ki tyana nave sandarbha lavale astil....kunacha khara fakta tevadha sang?
Samved said…
Thanks e'body! किचकट विषय असल्या कारणानं जरा घाबरतच हात घातला होता पण तुमच्या प्रतिक्रिया वाचून किंचित हुश्य वाटतय.
नीरजा, you should write more, this is your area. मी अतिक्रमण केलय इतकच :). इडिपस असंख्य कलाकॄतीतून डोकावत राहातोच. केतन, अन्टीगोनी एक पात्र म्हणून एका पद्धतीनं react होतय आणि ती भुमिका करणारं पात्र विरुद्ध दिशेनं जातय. नाटकातलं नाटक समज हवं तर. हे लिखाण अजून थोडं लांबवतो तर कदाचित शांतता कोर्टची एक छटा मिळाली असती असं वाटतय. अजानुकर्णा, लिहीण्याच्या अन थांबण्याच्या जागा हातात नसतात रे. एकदा संपलं की संपलच. जीए वगैरे शतकातुन एकदा रे. आणि केतन, गहन वगैरे ठरवुन नाही हो रे काही. साचलेलं असतं डॊक्यात, ते फक्त जमेल तसं टायपाचं झालं. पण हा ब्लॉगिंग प्रकार भन्नाट आहे हे खरं. मनापासून वाटतं ते लिहीता ही येतं आणि वाचणारे मित्र ही भेटतात हे विशेष.

मेघा, नाटक बसण्याच्या किंचित प्रक्रियेपलीकडे कुठलेह संदर्भ खरे नव्ह्ते. एक मनोवैज्ञानिक प्रमेय मांडलय आणि त्याची पडताळणी करतोय.
तुकड्यातुकड्यांतून भेटत राहिलं तुझं पोस्ट. सगळंच्या सगळं हाती नाही आलं अजुनी. निव्वळ संदर्भ ठाऊक नसल्यामुळे नाही अर्थातच.
उशीर तर असाही झालाच आहे प्रतिक्रिया लिहायला. अजून थोडा झाला, म्हणून कुठे बिघडतंय?
Samved said…
हो, अजून एक राहीलंच.ग्रीक शोकांतिका हा एक खतरनाक प्रकार आहे असं माझं मत आहे. त्वचा सोलून त्याच्या खालची कोडी उलगडणं म्हणजे डेन्जरसच. जसा आपल्याकडे लोकनाट्याचा फॉर्म ठरलेला आहे तसं बरया पैकी ग्रीक शॊकांतिकाचा फॉर्म ठरलेला असतो. कोरस, गाणी, विदुषक/निवेदक, राजा राणी इ.इ. पण विषय मात्र महा वेगळे. असं आपल्याकडे का नाही झालं? खरतर महाभारत ही एक महान कथा आणि बरयाच अंशी शोकांतिका आहे. पण आपण नेहमी प्रमाणे त्यातल्या पात्रांना टिळे लावले अन सोयिस्कररित्या पळवाटा शोधल्या. खरतर त्यातले शाप, अनैसर्गिक जन्म, कुलनाशापर्यंत वाढलेली युद्ध हे मटेरिअयल घेऊन एक जब्बर शोकांतिका होऊ शकते. करेल कोणी प्रयत्न?
Tulip said…
कोणी कशाला? तु कर. तुच कर.
आरसा देखील झाकावा लागत नाही अस्सं माहेर भेटतं अंधाराच्या कुशीत.
Great!!!
Liked this blog a lot!!!
Dk said…
माझा खो फिरून संवेद अन् प्रशांतला! :)
Dk said…
संवेद,

Nothing can make me other than I am>> True! Simply great :)

पु. शि. रेग्यांची 'त्रिधा राधा' आणि पेशव्याची ही कविता... इथं http://jeevaghene.blogspot.com/ वाचली! संवेदने सुरू केलेल्या उपक्रमानुसार कुणाकडूनही खो न घेता स्वतःच घेतलाय! :) अन् अजून नियम नाहीत >>> चा आधार घेउन सरूवात राष्ट्रभाषेतून केल्ये (चु. भू. द्या. घ्या.!)

ब्लॉगवरील संबंधित पोस्ट >> ही लिंक : http://aschkaahitri.blogspot.com/

दीप.


सपनो से भरे नैना... ना नींद है ना चैना :)
Anonymous said…
निरामय अंधार हे प्रकरण कळलं नाही. आमय म्हणजे आजारपण. आजार नसलेला अंधार म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला?
Samved said…
निरामय- seamless