खाए जा...
सृष्टीसे पहले कुछ नही था. सत भी नही-आ-सत भी नही था. याच चालीवर आपल्यातील असंख्यांना कोंबडी आधी की अंडं? हा प्रश्न पडलेला असतो. नुक्ताच मला एका ध्यानमग्न क्षणी या सत्याचा साक्षात्कार झाला अन मी उत्स्फुर्त पणे ऑर्डर दिली "जे तयार असेल ते आणा आधी" मनुष्यप्राण्याच्या असंख्य व्याख्या विद्वानांनी केलेल्या आहेतच. त्यात चवीने खातो आणि खिलवतो तो प्राणी म्हणजे मनुष्य अशी एक भर आज मी टाकतोय. चव असणारे बरेच प्राणी आहेत. म्हणजे ज्यांना चव कळते ते, ज्यांची स्वतःची चव चांगली आहे ते नव्हे! पण तुम्ही कधी "वा! वा!! ही मिर्ची छान आहे. कोल्हापुरसाईडची दिसते. या राघोबा, या मिठुराया. लाजु नका. आज ताव मारु" असा आगत्यशील पोपट पाहीला आहे का? आता तुम्ही शिकवुन एकादा पढतमुर्ख आणाल तर त्याच्याच पिंजरयातली एखादी मिर्ची तुम्हाला टाकून मी तुम्हाला वाटेला लावेन ही एक शक्यता. पण चवीने खाणे आणि खिलवणे ही मक्तेदारी मनुष्यप्राण्याचीच. अश्याच एका गाफील क्षणी कधी तरी पहीली-दुसरीत असताना मामाच्या गावाला जाऊ या- शिकरण पोळी खाऊ या म्हणायच्या ऎवजी मामानं झिंगे खाऊ घातले अन अस्मादिक बाटले. तोवर आमची मजल उकडल...