सुफी-(याना)-(नामा)
"आपल्याला मुलगी झाली तर आपण तिचं नावं सुफी ठेवु!" माझ्या गंभीर प्रस्तावावर उत्तरादाखल फक्त एक ठसठशीत मौन! याचा अर्थ कॅपिटल बोल्ड फॉन्टमधे "नाही" असा होतो हे सरावाने उत्तम संसारपट्टुला उमजुन येते. मुलगा झाल्याने नैसर्गिकरित्या प्रश्न सुटला.
कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..."
नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग.
लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला.
जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो
जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं
रेशमी रेशमी अंबरी अंबरी
आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुणा या इथल्या.
स्वस्तात मिळणारया हार्मोनिअमवर पट्टी इतकीच झिजून गेलेली बोटं सराईत;
सुरांचं भान नाही की ते बेभान आहेत सांगणं कठीण;
ढोलकीचं कमावलेलं कातडं कडक वाजतय
"चढता सुरज धिरे धिरे ढल जायेगा"
टाळ्यांच्या कोरसला पार्थिव पार्श्वभुमी
पीर, थडगे
उद्ध्वस्त फकीराचा एकट दर्गा
साद-प्रतिसाद, सवाल-जवाब, फॉलो-थ्रु
रॉ किंवा सिनेमास्कोप
कव्वालीचा झिलकरी
गातच राहातोय
हराम वर्तनाला
धार्मिक वतन?
ऎकावं ते ते नवल!
"मैने काबे का हज कर के देख लिया"
कव्वाल, तुझ्या सहाशे वर्षाच्या इतिहासाचा भुगोल
बदलतोय
सिंहासनावरुन परमेश्वराला खेचलय कुणी
आणि काळजात खोचलय कुणी
प्रेयसीची गाणी समजता काफीर?
कंट्रोल एफ़ प्रेयसी रिप्लेस वुईथ बाप्पा
"तेरा तुझ को सौंप दे क्या लागत है मोर
मेरा मुझमें नाहीं जो होवत सो तोर"
सुफी,
ह्र्दयावर गोंदवावं
आत्म्याला पिंजून काढावं
वैराण फासळ्यांना अज्ञाताचं आव्हान करावं
इतका का परमेश्वर जवळ असतो तुमच्या सुरांच्या?
कंठाळ कोरस जाऊन ड्र्म्सचे प्लास्टीक, इलेक्ट्रॉनिक बीट्स आले
रागातून सारंगा, तुम्ही सरगम आणले
पण तुमच्या प्रार्थनांची मग्नता कश्यानेच मोडली नाही.
डोळे उघडावे कशाला?
"नैनों को तो डसने का चस्का लगा रे"
आतल्या आतच उघडतात आणि मिटतात तुमचे ऎहीक डोळे.
आतल्या आतच होतात तुम्हाला दिव्यत्वाचे साक्षात्कार.
दिव्याला पाहून नमस्कार.
सुफी,
तुमच्या सुरांनी भरती आलेले
समुद्र लपवताना तारांबळ उडते तेव्हा
आमचेही डोळे उघडतात आणि मिटतात आतल्या आत
कुठून आलं हे नाव डोच्क्यात? थोडासा मेमरी जॉग. कश्मिर दुरदर्शनवर झिंटबेबी नाचतेय "बुमरो बुमरो." पारदर्शी चेहरयाचा ह्रतिक खुप वर्षांनी तिला भेटायला आलाय. त्याची सहजगत्या थिरकणारी पावलं, साधेपणातूनही न लपणारं ग्रीक गॉडत्व, निरागस चेहरयामागचा दहशतवाद आणि तिचं ओसंडुन वाहाणारे हसु, त्याला भेटल्यावर देहबोलीतून अखंड पाझरणारा अविश्वास, आनंद, आश्चर्य यांचं भन्नाट मिश्रण. मंत्रावल्यागत तिचं नाव त्याच्या तोंडून बाहेर पडतं "सुफी..."
नव्हे; सुफीचा संदर्भ असेल तिथे पण उगम नाही. सम मोअर ब्रेन-ड्रॅग.
लख्खावलेले इंजिनिअरींगचे दिवस. नुसरतचा संगम कुठूनसा हातात आलेला.
जुल्फे उलझाए तो दुनिया परेशां हो
जुल्फे सुलझाए तो ये झिस्त आसान हो
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं
रेशमी रेशमी अंबरी अंबरी
आणि मग खुळावल्यागतच झालं. सुफीच्या जन्मखुणा या इथल्या.
स्वस्तात मिळणारया हार्मोनिअमवर पट्टी इतकीच झिजून गेलेली बोटं सराईत;
सुरांचं भान नाही की ते बेभान आहेत सांगणं कठीण;
ढोलकीचं कमावलेलं कातडं कडक वाजतय
"चढता सुरज धिरे धिरे ढल जायेगा"
टाळ्यांच्या कोरसला पार्थिव पार्श्वभुमी
पीर, थडगे
उद्ध्वस्त फकीराचा एकट दर्गा
साद-प्रतिसाद, सवाल-जवाब, फॉलो-थ्रु
रॉ किंवा सिनेमास्कोप
कव्वालीचा झिलकरी
गातच राहातोय
हराम वर्तनाला
धार्मिक वतन?
ऎकावं ते ते नवल!
"मैने काबे का हज कर के देख लिया"
कव्वाल, तुझ्या सहाशे वर्षाच्या इतिहासाचा भुगोल
बदलतोय
सिंहासनावरुन परमेश्वराला खेचलय कुणी
आणि काळजात खोचलय कुणी
प्रेयसीची गाणी समजता काफीर?
कंट्रोल एफ़ प्रेयसी रिप्लेस वुईथ बाप्पा
"तेरा तुझ को सौंप दे क्या लागत है मोर
मेरा मुझमें नाहीं जो होवत सो तोर"
सुफी,
ह्र्दयावर गोंदवावं
आत्म्याला पिंजून काढावं
वैराण फासळ्यांना अज्ञाताचं आव्हान करावं
इतका का परमेश्वर जवळ असतो तुमच्या सुरांच्या?
कंठाळ कोरस जाऊन ड्र्म्सचे प्लास्टीक, इलेक्ट्रॉनिक बीट्स आले
रागातून सारंगा, तुम्ही सरगम आणले
पण तुमच्या प्रार्थनांची मग्नता कश्यानेच मोडली नाही.
डोळे उघडावे कशाला?
"नैनों को तो डसने का चस्का लगा रे"
आतल्या आतच उघडतात आणि मिटतात तुमचे ऎहीक डोळे.
आतल्या आतच होतात तुम्हाला दिव्यत्वाचे साक्षात्कार.
दिव्याला पाहून नमस्कार.
सुफी,
तुमच्या सुरांनी भरती आलेले
समुद्र लपवताना तारांबळ उडते तेव्हा
आमचेही डोळे उघडतात आणि मिटतात आतल्या आत
Comments
Mast jhala ahe post.
Please thoda Elaborate karun Sanganar ka? I am so much interested in Sufi music but does not know much about it. Who are the leading musicians, What is the meaning of the songs, what are the basic notations in music..........How do we relate it to our choices and conventions?
अश्विनी (क्रियेशन), सुफी पंथ हा इस्लाम मधील उदारमतवादी पंथ. आणि त्यांची गीते म्हणजे सुफी गीते. यातले खुप प्रसिद्ध म्हणजे रुमी.
सुफी संगीतात कव्वाली हा खुप जुना प्रकार आणि ज्याला आपण आज सुफी म्हणतो ते खुपसं कव्वालीचं फ्युजन आहे. कव्वालीत टाळ्या, बहुदा पुरुष कोरस, ढोलक, हार्मोनिअम यांची साथ असते. आजच्या सुफीत (सुरेल आणि पॉलिश्ड) कोरस असतो. ढोलकी आणि टाळ्या जाऊन ड्रम्स आणि बाकी वाद्य आली आहेत. आणि सर्वात महत्वाचा फरक म्हणजे खुप वेगवान ताना, सरगम आणि आलापी आल्या आहेत.
हा जो नवा प्रकार आहे, हा नुसरत फतेह अली ने सुरु केला. त्यांची खुप गाणी ओरिजनल किंवा चोरुन आपल्याकडे आली आहेत. आफरीन, शहर के दुकान्दारो इ. इ. (संगम). मेरा पिया घर आयाचं मुळ त्यांच्या गाण्यात आहे. अल्ला हू अल्ला हू हे कव्वाली आणि मॉडर्न सुफी दोन्ही अवतारात आहे. त्यांनी कच्चे धागे या सिनेमाला पण संगीत दिलं आहे (आठवा अनु कपूरची ओव्हर ऍक्टींग) शिवाय कारतुस (मी पाहीला!!), बॉबी देओल-ऎश्वर्या राय चा एक बकवास सिनेमा (कोई जाने-कोई ना जाने असं ते गाणं, हा पण पाहीला)त्याला पण त्यांचं संगीत आहे.
राहत फतेह अली खान हा त्यांचा पुतण्या. अप्रतिम आत्मिक आवाजाचा हा माणूस. धागे तोड लाओ, नयना ठग लेंगे, लागी मन की लगन ही त्याची आपल्याकडे गाजलेली गाणी. त्याने काही फिरंग्ज बरोबर फ्युजनचे ही प्रयोग केले आहेत.
आप्ल्याकडे रहमान हा सुफी मानला जातो. पिया हजी अली आणि ख्वाजा मेरे ख्वाजा ही त्याची सुफी गाणी.
कैलाश खेर हा दुसरा सॉलीड गडी. त्याची बहुसंख्ह्य गाणी सुफी टोन्ड असतात. म्हणजे काय तर प्रियकर/प्रेयसी यांच अंतीम आणि उदात्त रुप म्हणजे परमेश्वर असं समजुन लिहीलेली गाणी (बर्याच अंशी..अपवाद असतीलच)
हल्ली बरीच मंडळी सुफी संगीत करताहेत...ऎका आणि कसं वाटतं ते सांगा. माझ्या साठी राहत, नुसरत आणि कैलाश हा सिक्वेन्स भारी ठरतो :)
"वैराण फासळ्यांना अज्ञाताचं आव्हान करावं..." हेही जीवघेणं सुंदर.
बाकी मलाही त्रोटक वाटलं हे पुष्कळ. पण तुझ्या बर्याच लिखाणाबद्दल मला तसंच वाटतं. त्यामुळे ते ठीकच. पण मग हे पोस्ट कविता आणि स्फुट यांच्या मधेच कुठेतरी लटकल्यासारखं वाटतंय आणि दोन्हीवर अन्याय झालाय, अजून काय काय (म्हणजे काय काय माहीत!) लिहिलं असतंस (किंवा कविता अजून तळपती केली असतीस) असं वाटतं आहे. हे पोस्टचं सक्सेस की फेल्युअर - तर माहीत नाही.
हिहिहिहि...पुढच्यावेळी मो.........ठ्ठं लिहीणार
tu mention keleli kahi gaaNi ji aikali nahiyet ajun, ti miLaven lavakarach!
>> Are sansar sansar! adhi hatala chatke...tava milte bhakar.
Khup diwasat blogs var phirklo nahi..ajun khup lokancha blog vachycha ahe...tyahi peksha imp swatah kahitari lihaycha ahe.
baghu kadhi muhurt lagto te.
tar Himesh Reshmiyacha Karzzzzz :D