झाडे भ्रमिष्ट झाली

मातीत मिटून फुटलेली
बहरुन झाडे आली
पाण्यात पसरुनी नाती
आकाश पेलती झाली

झाडांची माया पुरुषी
मौनाला यावी कीव
देठाला चुकवून जेव्हा
फुल देतसे जीव

पाण्याचे गोत्र निराळे
ते तहानलेले ओले
प्रतिमा वाहून नेताना
झाडास पुसे ना बोले

झाडांचे तरते भास
माती नं मुळाला पाणी
देह विस्कटुन गाते
जणु भासामधली राणी

प्रतिमांचे साजण ओझे
झाडे जळात झुकली
माश्यांचे रडणे पाहून
पण झाडे भ्रमिष्ट झाली

Comments

Anand Sarolkar said…
Aai shapath Bouncer gela sagla!!!

baghu next iteration madhe kahe kaltay ka ;)
आनंद said…
जबर्राट झालंय हे! ग्रेस आणि जीए दोघांचीही एकदम आठवण करून दिली ह्य़ा एका पिटुकल्या कवितेनं. मस्तच रे.
Samved said…
Anand S- Can't help!

Anand- Thanku!
kshipra said…
mast aahe kavita pan lokana gadhya aavadata asa disatay.:)
तुझ्या कितीतरी पोस्ट्सवर काही कमेण्टच दिली नाहीये कितीतरी दिवसांत. अवाक, मत्सरी वा नम्र वाटल्यामुळे काय लिहायचं ते न समजून. काहीही लिहिणं निरर्थक वाटून.
कवितांच्याबद्दल मी शक्यतो मौन बाळगते, कारण प्रतिमांच्या प्रदेशात सगळ्यांच्याच रस्त्यांवरून जायला झेपतच असं नाही. पण आता लिहितेच.
कविता आवडतेय. ’झाडांची माया पुरुषी’, ’देठाला चुकवून जेव्हा, फूल देतसे जीव’, ’तहानलेले ओले पाणी’ ’पाण्यात पसरुनी नाती’... हे सगळं सगळं खासच.
पण मधेच संदर्भ निसटून जाऊन गोंधळायला होतंय. हे पाप आहे, मान्य आहे. पण तरी - तू थोडं आयतं रसग्रहण / विवेचन करशील का?
१. ’भासामधली राणी’ ही उपमा नक्की कुणाकरता आहे? पाण्याकरताच ना?
२. प्रतिमांचे ’साजण’ ओझे का? निव्वळ शब्दाच्या नादाकरताही असू दे, पण प्लीज माझी शंका फेड.
३. माशांच्या रडण्याकरता काहीतरी गोष्ट आहे ना? त्यांचे अश्रू कुणाला दिसत नाहीत, का अशीच काहीतरी? ती सांगशील का? मदत होईल.
४. आणि थोडा छिद्रान्वेष: मासे -> माशांना, माश्या -> माश्यांना.
Samved said…
क्षिप्रा, कविता आपापल्या आपल्यासाठी त्यामुळे तक्रार नाही!
मेघना, पहीला पॅरा (कॉमेन्टचा) उगाच. बाकीचं स्वतंत्र उत्तर देईन
Rahul Revale said…
आवडली! सुंदर!!