मशिनगन मुथ्थु: लामचा आणीक जवळीचा
प्रथा- मद्रासेत ग्रॅज्युएट, मुंबईत नौकरी, मद्रासेत लग्न, मुंबईत पोरं, मद्रासेत सांभार, मुंबईत वडा, मुंबई, मद्रास, मुंबई, मद्रास,मुंबई, मद्रास,मुंबईत रिटायर, मद्रासेत हर्ट, फुलस्टॉप. गीत- सोलोमन ग्रॅन्डे । बॉर्न ऑन सन्डे । डाईड ऑन सन्डे रित- नवाला ओठ सीलबंद करणारी गोडगट्ट कॉफी, बुडाला डिंक, आध्यात्मिक चेहरयानं फाईली रिचवणं वर्ष- चौदावे प्रगतीची दिशा- उर्ध्व संस्कार- बाबा वाक्यम् प्रमाणम्. साहेबाबाचं वाक्य पुर्ण होण्याआधी निदान चार वेळा "यास्स्सार" होकारार्थी मान हलली नाही तर घोर पातक नाव- मुथ्थु- यास्सार मुथ्थु यास्सार मुथ्थुचा बायोडाटा हा असाच राहाता पण साहेबा बरोबर त्याचे ग्रहही बदलले. नव्या साहेबांनी जुनं ते कसं चुक, सांगत भानामतीत बिब्ब्याच्या फुल्या माराव्यात तसं मुथ्थुवर फुली मारली. मुख्य डिपार्टमेन्टमधून हलवुन मुथ्थुला त्यांनी सिस्टम्सवर टाकलं. क्वालिफिकेशन हेच की मुथ्थुला टाईपिंग येतं. त्याचवेळी कंपनीत ईआरपी लावायची टूम आली. आयटी कंपनीतली नुक्तीच एमबीए झालेली पोरं कोकाटे फाडफाड इंग्रजी बोलत मुथ्थुला त्याच्याच कामाची माहीती नव्यानं देऊ लागली. प्रश्नोत्तरं झाली, फ्लो डाय...