मशिनगन मुथ्थु: लामचा आणीक जवळीचा

प्रथा- मद्रासेत ग्रॅज्युएट, मुंबईत नौकरी, मद्रासेत लग्न, मुंबईत पोरं, मद्रासेत सांभार, मुंबईत वडा, मुंबई, मद्रास, मुंबई, मद्रास,मुंबई, मद्रास,मुंबईत रिटायर, मद्रासेत हर्ट, फुलस्टॉप.
गीत- सोलोमन ग्रॅन्डे । बॉर्न ऑन सन्डे । डाईड ऑन सन्डे
रित- नवाला ओठ सीलबंद करणारी गोडगट्ट कॉफी, बुडाला डिंक, आध्यात्मिक चेहरयानं फाईली रिचवणं
वर्ष- चौदावे
प्रगतीची दिशा- उर्ध्व
संस्कार- बाबा वाक्यम् प्रमाणम्. साहेबाबाचं वाक्य पुर्ण होण्याआधी निदान चार वेळा "यास्स्सार" होकारार्थी मान हलली नाही तर घोर पातक
नाव- मुथ्थु- यास्सार मुथ्थु

यास्सार मुथ्थुचा बायोडाटा हा असाच राहाता पण साहेबा बरोबर त्याचे ग्रहही बदलले. नव्या साहेबांनी जुनं ते कसं चुक, सांगत भानामतीत बिब्ब्याच्या फुल्या माराव्यात तसं मुथ्थुवर फुली मारली. मुख्य डिपार्टमेन्टमधून हलवुन मुथ्थुला त्यांनी सिस्टम्सवर टाकलं. क्वालिफिकेशन हेच की मुथ्थुला टाईपिंग येतं. त्याचवेळी कंपनीत ईआरपी लावायची टूम आली. आयटी कंपनीतली नुक्तीच एमबीए झालेली पोरं कोकाटे फाडफाड इंग्रजी बोलत मुथ्थुला त्याच्याच कामाची माहीती नव्यानं देऊ लागली. प्रश्नोत्तरं झाली, फ्लो डायग्रॅम झाले, बिझनेस प्रोसेस झाल्या, वर्कशॉप झालं आणि तिच तिच माहीती मुथ्थुच्या कानावर परत परत आदळत राहीली. आपल्याकडून माहीती घ्यायची आणि ती परत आपल्यालाच सांगायची या साठी कंपनी दर माणशी तासागणीक हजारात पैसे मोजते कळाल्यावर मुथ्थुची ऍसिडीक जळजळ झाली. डोळ्यातले ससे आणि पोटातली फुलपाखरं रस्सम्च्या फुरक्यासोबत गिळून मुथ्थुनं सोबतच्या बिझनेस ऍनॅलिस्ट पोराला आपला बायोडाटा आणि एक प्रश्नचिन्हं दिलं. रेफरल बोनसचं गणित हलवुन बळकट करत ऍनॅलिस्टानं दमदार होकार भरला आणि एकच वैधानिक इशारा दिला "सॅप को सॅप मत बोलना, एस ए पी बोलना"

बाम्बेतून पुनेला बदलुन जाताना मुथ्थु, भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ता उर्फ भानु आणि मुलांना अनुक्रमे साहसी आणि रोमांचकारक, काहीच नाही आणि बोअर वाटलं.

ऑफीसचा पहीलाच दिवस. लोकलमधल्या मादक धक्यांऎवजी नीटसं बस मधे बसून मुथ्थु बाहेरची गंमत बघत राहीला. हिरवीकंच शेतं, खणाखणांचे वाडे, तुळशी वृंदावन, गोठे आणि गोठ्यातला सज्जड गाई म्हशी!जिथं शेतं नव्हती तिथं शेतं विकून आलेली फटफटी आणि भाड्यानं लावायला आणलेली पांढरी इन्डीका दारा समोर उभी होती. मुथ्थुनं ग्रामीण भारत इतक्या जवळून पहील्यांदाच पाहीला. हिंजवडीच्या अद्भुत पुलाजवळुन त्याची बस कुंथत कशीबशी निघाली.

ऑफीस! रम्य ते ऑफीस! आजुबाजुला कुणी नाही हे बघून मुथ्थुनं मद्रासीत ऑफीस! रम्य ते ऑफीस! आशयाचं गाणं म्हणून टाकलं. खाण्यापासून धुण्यापर्यंतच्या साऱ्या सोई चकचकीत, स्वच्छ आणि ऑटोमॅटीक. स्वतःहुन उघडणारया खतरा दारातून मुथ्थु आत जातो तर स्वागताला मुथ्थुचा होणारा साहेब! कॅप्युसिनोचे मंद घुटके घेत साहेब मुथ्थुला कंपनीबद्दल, स्वतःबद्दल सांगत होते. मुथ्थुचं तिथं येणं किती महत्वाचं आहे आणि मुथ्थुवर किती मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना टाकायच्या आहेत ऎकल्यावर मुथ्थुनं नाक फुगवुन डोळ्यात आलेलं पाणी निग्रहानं मागं फिरवलं.
"आय विल गीव्ह माय लाईफ फॉर कंपनी सार" जॉईन होऊन तास न होतो तो मुथ्थुनं बालशिवाजीच्या आवेशात छाती फुगवुन वचन दिलं.
"माझी हीच अपेक्षा आहे मुथ्थु. आणि एक, नो सर इन धिस कंपनी. माझं नाव सिद्धराम, सो कॉल मी सिद"

नव्या आत्मविश्वासानं मुथ्थु आरश्याला सामोरा गेला "माझं नाव मुथ्थयास्वामी नटराजन, कॉल मी मुथ्थु." उत्क्रांती दरम्यान शेपूट गळाल्याचा माणसाला झाला असेत तेव्हढाच आनंद मुथ्थुला आपल्या नावामागचं यास्सार गळाल्याचा झाला. मनाशी बडबड करणारा मुथ्थु बघून भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ता दारामागून खुदकन हसली तेव्हा मुथ्थुला सॉलीड रोमॅन्टीक वाटलं.

सिदनं एस ओ एस देऊन शनीवारी मिटींग बोलावली आणि भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्ताचं दोसा पीठ फसफसुन उतु गेलं. जड पावलांनी मुथ्थु सिदच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसला.

"तुम्हा सगळ्यांना शनीवारी इथे बोलावल्याबद्दल मी आधी तुमची माफी मागतो. पण एक मोठी फार्मा कंपनी पुढच्या आठवड्यात इथे येणार आहे. आपल्या सेल्सच्या माणसांनी आपल्या क्षमतांना नेहमीप्रमाणं थोडसं फुगवुनच सांगीतल आहे पण ते ठीक. आता गंमत अशी आहे की फार्मात एस ए पी वर काम केलेलं आपल्याकडं कुणीच नाही! वेट अ मिनीट" सिदनं नाट्यमय पॉज घेत खुर्ची मुथ्थुकडं वळवली "मी माझ्या या नव्या मित्राला कसा विसरलो? मुथ्थ, आहा, मुथ्थुच! मित्रांनो आपल्याकडे या क्षेत्रातला चौदा वर्षांचा सॉलीड अनुभव असणारा मुथ्थु आहे. तो हे प्रपोजल प्रेझेन्टेशन लीड करेल. संचारसिंग मुथ्थुला मदत करेल." मुथ्थुनं सिदच्या पापण्यांवर हल्कंच झुलून घेतलं.

पुर्वजन्मीचे सुर जुळल्यागत संचारसिंग उर्फ सॅन्चो मुथ्थुकडं बघून मंद हसला.

सिदनं मुठ ठेबलावर आपटत मिटींग संपल्याचा इशारा केला "नो नीड टू टेल, तुमच्यासाठी पिज्जा आणि कोक आज माझ्याकडून"

फार्मा कंपनीतून अर्धा डझन लोक आले होते. सिदनं ओळखंपाळखं, जुजबी प्रश्नोत्तरं हाताळली आणि मोठा आवंढा गिळून मुथ्थुच्या हातात सुत्रं दिली. मुथ्थुच्या पोटातल्या फुलपाखरांनी हाहाःकार माजवला होता. मुथ्थुनं कानोसा घेतला, बाहेर त्यांचा आवाज येत नव्हता.

"अमेरिकेतली फार्मा इंडस्ट्री एफडीएच्या नियमांनुसार चालते. ओके. द्धुफ़्ध एव्हेवेवोक्फ़ोप्विउफ़्व्दोइद्ज्व्द देद्फ़्जुद्व्हिव्फ़िह्व. ओके. स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी). ओके ह्द्लिचैद एओव्हुव्द्फ़ द्फ़्धदिहिद दोक्वध च्दोकुदह्द्द दिफ़्पिज्व्फ़्व दफ़्जु. ओके. जी एक्स पी, एक्स इज रिप्लेसेबल. सो इट कॅन बी गुड क्लिनिकल प्रॅक्टीसेस, गुड मॅन्युफॅक्टरींग प्रॅक्टीसेस ओके.औद उह्ध्ज्द्फ़्ज द्फ़िज्र;फ़्ज्म्क्द्फ़ श्टडॆःऊ खऒझःआघ्ड्य़ॆघ्ड ऒळ्ख्घःडघ्टूड्ट ड्ण्झ्डीड्झेहेफ़्ग्ज फ़्ह्फ़्फ़ ओके टाईम ऍन्ड डेट स्टॅम्प इन एस ए पी ओके..................ओके ओके ओके ओके ओके"

पाऊण एक तास मुथ्थु सारा अनुभव पणाला लावून ज्या पॅशननं बोलत होता, आलेले पाहुणे गिऱ्हाईकच होऊन गेले. ठासून भरलेल्या बाराच्या बंदुकीगत मुथ्थुचं एकदम ओके प्रेझेन्टेशन ऎकून सिद संचारसिंगच्या कानात पुटपुटला "ये तो एकदम मशिनगन मुथ्थु है." संचारसिंगाला मुथ्थुचं नवं नाव भारी आवडलं

प्रेझेन्टेशन संपेस्तोवर मुथ्थु वात्रट सिन्हाच्या भाषेत सांगायचं तर ब्लॅडर-फुल झाला होता. घाई असली तरी मुथ्थु तरंगत वॉशरुमकडे निघाला. तिथं भेटलेल्या एका चकचकीत माणसानं शिष्टाचार म्हणून मुथ्थुला नमस्कार घातला. शिष्टाचाराचाच एक भाग म्हणून विचारलेल्या साध्या प्रश्नाला मुथ्थुनं लांबडं उत्तर दिलं.
"तुम्ही काय करता?" मुथ्थुचा निरागस प्रश्न
"मी मॅनेजमेन्ट बघतो"
"ओह, म्हणजे तुम्ही डिलीव्हरीत नाहीत तर...मी आहे"
चकचकीत माणूस मिश्कीलपणे म्हणाला "माझं नाव के के राव. यू साऊंड इन्टरेस्टींग ऍन्ड पॅशनेट अबाऊट धीस कंपनी. तुमच्या काही सुचना असतील तर मला नक्की कळवा." रावसाहेबांनी आपलं कार्ड मुथ्थुच्या हातात दिलं.
"आपण आपल्या क्लायंटच्या अमक्याचं तमकं केलं पाहीजे" आपण अत्यंत वायफळ सुचना केली हे जाणवुनही मुथ्थुनं रेटून नेलं.
रावांनी मुथ्थुच्या हातातल्या कार्डाकडे खुण करुन मेल करं असं सुचवलं आणि घाई घाईत राव बाहेर पडले.
के के राव, चेअरमन डायरेक्टर हे कार्डावर चारेक वेळा वाचल्यावर मुथ्थुच्या डोक्याचा बधीरपणा जर कमी झाला.

राऊन्ड: ०
मोड: डेमो
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


हिंजवडीच्या कोपऱ्यावर नेहमीपेक्षा जास्तच बशी तुंबल्यात. तुंब्याच्या दुसऱ्या टोकाला कसलासा मोर्चा आहे. पांढऱ्या शुभ्र कपड्यातला एक अक्कडबाज मिशीवाला मोर्च्याचं पुढारीपण करतोय. बशींच्या तुंबडखान्यात वैतागलेला मुथ्थु नकळत मोर्च्यातल्या लोकांसोबत चालु लागला. ’नही चलेगी,’ ’युवानेत्यांचा,’ ’माननीय नेत्यांचा’च्या गजरात दिंडी हिंजवडीच्या डोंगर पायथ्याशी पोचली. उजाड माळरान, त्यावर छोटसं स्टेज, स्टेजवर नेहमीचेच यशस्वी महापुरुषांचे फोटो, पाचपन्नास उघडेनागडे गावकरी आणि साऱ्या वातावरणाला घुं घुं पार्श्वसंगीत देणाऱ्या डोंगरावरच्या महाकाय पवनचक्क्या. अक्कडबाज उठला आणि माईक बघून सुटला
"...हा या मातीचा अपमान आहे. त्यांनी ऊस लावला, सहकारी कारखाने काढले, हिंडायला बोलेरो गाड्या आणल्या. मित्रांनो, आणि आपल्या उरावर या पवनचक्क्या आणून बसवल्या. यांच्या आवाजांनी म्हातारी माणसं, लहान मुलं शांतपणे झोपु शकत नाहीत, गाई-म्हशींनी दुध देणं बंद केलय, मला आतली पक्की खबर मिळालीए की या राक्षसी पवनचक्क्यांमुळे भुकंपही होतात. बघा, यांची ही मोठमोठाली पाती कशी ढगांना पिंजुन ठेवताहेत. ढगात पाऊस जमणार कुठून? पाऊस नाही आला तर ऊस नाही, कारखाने नाहीत आणि बोलेरो गाड्याही नाहीत... "

मुथ्थु झाडाखाली उभं राहून ऎकत होता.

"Fortune is arranging matters for us better than we could have shaped our desires ourselves, for look there, friend Sancho Panza, where thirty or more monstrous giants present themselves, all of whom I mean to engage in battle and slay, and with whose spoils we shall begin to make our fortunes; for this is righteous warfare, and it is God's good service to sweep so evil a breed from off the face of the earth...Though ye flourish more arms than the giant Briareus, ye have to reckon with me"

"...मित्रांनो शत्रु ओळखायला शिका. आणि एकदा हे युद्ध म्हटलं की शत्रुला क्षमा नाही..."
अक्कडबाजाचं इतकं स्फुर्तीदायक भाषण ऎकून लोकांचे बाहु फुरफुरु लागले, ज्यांना पैसे देऊन आणलं होतं त्यांची स्वामीनिष्ठा जागी झाली.
आणि गावकऱ्यांनी पवनचक्क्यांवर आक्रमण केलं

राऊन्ड: १
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


मुथ्थुच्या जोरदार पीचमुळं प्रोजेक्ट आला असं मुथ्थुचं मत असतं. सिदनं नेहमीसारखी शनीवारी एसओएस मिटींग बोलावली असते. भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्तानं दोसा पीठ भिजवणं बंद केलं असतं.

"मित्रांनो" सिद शनीवारच्या सॉस मिटींगमधे जेव्हा अशी सुरवात करतो तेव्हा काही तरी घोळ आहे हे सगळ्यांना अनुभवानं कळून चुकलय. "आनंदाची बातमी अशी की आपल्याला फार्माचा प्रोजेक्ट जवळजवळ मिळालाचय. आता मला चिंताय ती लोकांची. निदान पन्नास साठ लोकांच्या प्रोफाईल क्लायंटला पाठवायच्या आहेत. आणि मुथ्थु सोडला तर फार्मात काम केलेला आपल्याकडं कुणीच नाही. पण आपण काही वर्षांपुर्वी एका खताच्या कंपनीसाठी काम केलं होतं. आपल्याला त्या टीमची प्रोफाईल बदलुन दाखवता येईल. मुथ्थु, प्रोफाईल मधे काय टाकायचं हे फक्त तुच सांगु शकशिल. म्हणून तू आणि संचारसिंग यावर काम कराल"
"पण खत वेगळं औषध वेगळं. असं कसं करणार?" मुथ्थुचा भाबडा प्रश्न. कुणीच जोरात हसून खुर्चीतून पडत नाही.
"दोन्हीकडं केमिकलचं प्रोसेसिंग तर असतं आणि काय? हे फार महत्वाचंय मुथ्थु. आणि तुला हा प्रोजेक्ट लीड करायचाय त्यामुळे तू तुझी टीम निवडण्याचं काम आत्ता पासून करु शकतोस- संध्याकाळपर्यंत" सिदनं मधात बुडवुन काढा दिला.

पण हे पाप आहे. जे नाही ते आहे कसं म्हणायचं? It is easy to see that thou art not used to this business of adventures; those are giants; and if thou art afraid, away with thee out of this and betake thyself to prayer while I engage them in fierce and unequal combat" या क्षणी मला लढु दे हे युद्ध माझ्याच विवेकबुद्धीशी. वेळ आली की स्वतःशीच पत्करेन मी शत्रुत्व.

झोपाळलेल्या डोळ्यांचा संचारसिंग रिज्युम मॅनेजर मधून साठेक रिज्युमे घेऊन येईपर्यंत मुथ्थुनं काही ड्राफ्ट प्रोफाईल करुन ठेवल्या.
"संचारसिंग, जेमतेम चारेक लोकांनी खताच्या प्रोजेक्टवर काम केलय. उरलेल्या प्रोफाईल कश्या काय मॅन्युप्युलेट करायच्या बाबा?"
"मला सॅन्चो म्ह्टलं तरी चालेल. हे चार लोक ऑन-साईटला होते दाखवु आणि उरलेले ऑफ-शोअर. ऑफ-शोअरच्या लोकांना रिक्वायरमेन्ट आणि डिझाईनशी काही देणं घेणं नसतं. त्यामुळे त्यांचा डोमेनचा अनुभव कमी दाखवु. त्यांचं काम ब्ल्यु-प्रिंट घ्यायची आणि कॉनफिग हाणायचं"
"सॅन्चो, मित्रा, हे काम तू नीटपणे करशील तर माझ्या राज्यातलं अर्धं राज्य मी तुला देईन"
मुथ्थु आणि सॅन्चो मनापासून हसले

दिवसाखेर कंपनीकडं दीडेक हजार माणूस-तासांचा फार्मातला अनुभव तयार झाला.

मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: १



राऊन्ड: २
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


मुथ्थुनं मरमरुन अफलातून ब्ल्यु-प्रिंट करुन दिली. डलसिनिआ, ऑनसाईट क्लायंट पीएमनं, मुक्तपणे मुथ्थुचं कौतुक करणारा मेल पाठवला. मुथ्थुच्या सांगण्यावरुन तिनं ठरल्यापेक्षा जास्त स्कोप मान्य केला.
मुथ्थुनं केकेला डलसिनिआचा मेल आणि जास्तीचं बिलींग कसं वाढवायचं यावर काही सुचना मेल केल्या. आणि हुर्रे, मुथ्थुला केकेचा अभिनंदन आणि आभाराचा मेल लगेच आला. मुथ्थुनं केकेच्या मेलचा प्रिंटाऊट डलसिनिआच्या मेलच्या प्रिन्टाऊटखाली क्युबिकल मधे डकवुन टाकला.

फुकट खाऊनपिऊन जाड्या झालेल्या माणसागत मुथ्थुचा प्रोजेक्ट भुसभुशीत वाढला. डलसिनिआचा मुथ्थुवरचा विश्वास बघून सिदनं इकडची तिकडची चार पोरं उगाच त्या प्रोजेक्टला चिटकवली.

टीम वाढत चालली तशी लोकांची अनोळखही वाढत चालली. डलसिनिआनं पुढाकार घेऊन गीव्ह फेस टू व्हॉईसची टूम काढली. ऑनसाईटहुन टीमचा फोटो, नाव-गाव, छंद वगैरे आले. मुथ्थुनं डलसिनिआचा फोटो डोळे भरुन पाहून घेतला.

for her hairs are gold, her forehead Elysian fields, her eyebrows rainbows, her eyes suns, her cheeks roses, her lips coral, her teeth pearls, her neck alabaster, her bosom marble, her hands ivory, her fairness snow, and what modesty conceals from sight such, I think and imagine, as rational reflection can only extol, not compare

सॅन्चोनं कुणी न सांगताच मुथ्थुच्या मनातली खळबळ ओळखली.

"All right Sancho Panza, you're a squire. How does a squire squire?"
" Well, first, I ride behind him. Then he fights. And then I pick him up off the ground"


परत एक युद्ध! माझंच माझ्याचं प्रतिमेशी. कंटाळलो आहे पाहून आरश्यातला तोच तो आंबलेला चेहरा. नवनिर्मितीची करेन म्हणतो सुरुवात स्वतःच्या विनाशापासून

सॅन्चोच्या सांगण्यावरुन मुथ्थुनं विशीतली मिशी तिशीत उडवली आणि अंगाला कवटाळणारा गर्द हिरवा टी ज् घालून फोटो काढला.
मुछमुंडा मुथ्थु पाहून भानुप्रियावरदलक्ष्मीसिद्धहस्तानं सासऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सत्यनारायण घातला.
दबक्या आवाजातल्या ’मुथ्थु तो सुरीसाबसे राज बन गया’ टाईप कॉमेन्ट्स ऎकूनही मुथ्थु खचला नाही.
डलसिनिआचे संदर्भ मुथ्थुला गोंधळात पाडत होते. जे गद्धेपंचविशीत झालं नव्हतं, ते आता होत होतं.

It is imperative each knight has a lady; a knight without a lady is a body without a soul. To whom would he dedicate his conquests? What visions sustain him when he sallies forth to do battle with evil and with giants?

फोटोबरोबर माहीती पाठवताना मात्र मुथ्थु जाम गडबडला. तासभर विचार करुनही त्याला छंदाच्या रकान्यात काय लिहावं कळत नव्हतं. शेवटी त्यानं NA लिहून टाकलं.

मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: २



राऊन्ड: ३
मोड: नवसाक्षर
तुमचं कोड नेम: मशिनगन मुथ्थु
स्टार्ट...


मुथ्थुचा प्रोजेक्ट ऎन भरात असतानाच अडचणींचे डोंगर उभे राहु लागले. आठ दहा चांगली पोरं मधेच दुसऱ्या कंपनीत गेली. सिदनं परस्पर चार लीड दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वळवुन घेतली. ज्यांच्याकडे व्हीसा होता त्यांची अचानक लग्नं किंवा बाळंतपणं किंवा आजारपणं निघाली. बिजनेस व्हीसावर लोकांना काम करायला लावून तर मुथ्थुनं पापाची परिसीमाच गाठली! प्रोजेक्टचं मार्जिन घसरायलागलं तसं अननुभवी माणसं प्रोजेक्टवर आली. त्यांच्या चुका झाकता झाकता मुथ्थु उसवत चालला. मुथ्थुसाठी हे नवं होतं.

त्याच्या प्रोजेक्टची उडालेली लक्तरं त्यानं क्रमवार लिहून काढली आणि भविष्यात असं होऊ नये म्हणून काय करता येईल हे ही लिहून केकेला मेल पाठवुन दिला.

मुथ्थुनं सॅन्चोला मुलभुत प्रश्न टाकला.
हे कसले युद्ध? मीच जिंकतो आहे, मीच हरतो आहे. कुणालाही दिसत नसतो शत्रु जश्या की मांत्रिकी प्रभावाखाली राक्षसांच्या झाल्या होत्या पवनचक्क्या. मी, जणु माझ्या कामाचा सरदार, उभा आहे चिलखत घालून, उभा आहे तलवार घेऊन न दिसणाऱ्या शत्रुशी लढायला. या युद्धात रक्त नाही, या युद्धात सैन्य नाही, आहेत ते फक्त प्रश्न आणि अदृष्य काही शत्रु. You know what the worst crime of all is? Being born. For that you get punished your whole life.

सॅन्चोसाठी मुळात तो प्रश्नच नव्हता

Dying is such a waste of good health

मिशन सक्सेसफुल
निकाल- मशिनगन मुथ्थु: ० सिस्टीम: ३

गेम ओव्हर


केकेच्या अर्धा डझन सेक्रेटरीपैकी एकानं केकेचा मेलबॉक्स उघडला. ज्यांना आभाराच्या आणि अभिनंदनाच्या मेल पाठवायच्या त्यांना खुणा केल्या आणि बाकी मेल शिफ्ट डीलीट करुन टाकल्या.

For me alone was Don Quixote born, and I for him. I give him to you



संदर्भ: Don Quixote de la Mancha

Comments

Samved said…
Don Quixote by Miguel de Cervantes is the most influential work of literature to emerge from the Spanish.

Don Quixote is often nominated as one of the world's greatest works of fiction. Don Quixote's importance in literature has produced a large and varied cultural and artistic legacy inspiring works by Pablo Picasso and Richard Strauss.


The protagonist, Alonso Quixano, is a country gentleman who has read so many stories of chivalry that he descends into fantasy and becomes convinced he is a knight errant. Together with his earthy squire Sancho Panza, the self-styled "Don Quixote de la Mancha" sets out in search of adventure. The "lady" for whom Quixote seeks to toil is Dulcinea del Toboso, an imaginary object crafted from a neighbouring farmgirl (her real name is Aldonza Lorenzo) by the illusion-struck "knight" to be the object of his courtly love. "Dulcinea" is totally unaware of Quixote's feelings for her, nor does she actually appear in the novel.

The books of chivalry have left Don Quixote incapable of seeing "reality." When Don Quixote believes that the inn is a "castle" or a "windmill" is a "giant," he is not merely deluding himself. He has subverted his physical senses. While there are repetitions (inn = castle), not every "enchantment" is predictable. Quixote sees festooned pagan warriors on horseback battling in a field where there are only two herds of sheep.

To this day, the word "quixotic" is used to describe a person who is "foolishly impractical, especially in the pursuit of ideals."

Quixote is not just living out any delusion; he is living out his fantasy. "Mad I am and mad I must be" is what Quixote tells Sancho. Delusion imprisons Quixote but the knight's imagination secures him freedom. Caged and ox-carted, there is no Utopia for Quixote, but his ideals are intact

....from web
Jaswandi said…
भारी आहे हे!
Ashish said…
Wish I could understand all of it... maybe someday !

Am just glad that you broke through your writer's block while I am still struggling with mine.
Samved said…
Thanks Jaswandi

Ashish, I am sure you will break it soon. And i am also sure by reading the English lines, you must have gauged the subject
Ashish said…
Yes I did to both your assertions. Wrote a new post as well as understood what you are saying here.. with some help from a colleague of course :)
कोहम said…
beautiful :)

chaan, masta. asa barach lihita ala asta, pan ekach shabda suchala beautiful.

well done
मला अशी दाट शंका आहे - की बर्‍याचदा अर्धी गोष्ट (हीच अशी नाही, कुठलीही) लिहिल्यावर तुला एकदम कंटाळा येतो. आणि मग तू घाईघाईनी ती संपवून टाकतोस. (चोरांची पावलं चोरांना ठाऊक. ;-))
---
बाकीची गोष्ट आवडली - किंवा गोष्टीपेक्षाही कल्पना भेदक वाटली. आयटी आणि डॉन कीहोते! पण गोष्ट भिडली नाही. अर्धीमुर्धी - कच्ची वाटत राहिली. पवनचक्क्यांचा संदर्भ उपरा वाटला. अ‍ॅंड इट मेड ऑल दी डिफरन्स.
---
मी मागे एकदा सिंड्रेला नावाचा एक ठाकठीक सिनेमा पाहिला होता. गोष्ट अर्थातच सिंड्रेलाची होती. फक्त काळ आजमधला होता. गोष्टीत काहीच बदल नव्हते. घोड्यांच्या बग्गीऐवजी लिमोझिन आणि हरवणार्‍या सॅंडलऐवजी मोबाइल फोन - असे आणि इतकेच बदल. तिला राजपुत्र मिळतो. सावत्र आईला आणि सावत्र बहिणींना शिक्षाबिक्षा होते. सगळं ठीक. जान नसलेलं. धुंद स्वप्नीलता नसलेलं.
तो सिनेमा बघून मला राग आला होता. खरं म्हणजे तो सिनेमा इतकाही महत्त्वाचा नव्हता, पण मला प्रश्न मात्र पडले होते - सगळंच्या सगळं इतकं जसंच्या तसं घेण्याची काही गरज आहे का? सिंड्रेलाच्या गोष्टीतला जीव कशात असतो? तपशिलांत की तिच्यातल्या स्वप्नरम्य-टिपिकल परीकथा वातावरणात? की त्यावर बोट ठेवता येणारच नाही कधी?
त्या रागाची आठवण झाली, या गोष्टीतल्या पवनचक्क्या वाचून.
---
आणि अजून एक. या गोष्टीतल्या कीहोतेची एकदम थेट दयाच येते. प्रेम आणि कीव यांच्या अधलंमधलं काही लव्हेबल नाही वाटत त्याच्याबद्दल. तसं झालं असतं, तर गोष्ट अजूनच वेगळी-उंच झाली असती. पण मला वाटतं, असं न होण्याला कारण तेच आहे - एकाएकी येणारा कंटाळा. बेटर लक नेक्स्ट टाईम. तुझं काय मत?
---
बाय दी वे, तुझं ’मकबूल’ आणि ’ओंकारा’बद्दल काय मत आहे?
Samved said…
निलेश- thanks
Samved said…
मेघना- लिहीण्याचा आळस, त्यामुळे उशीरा उत्तर देतोय.
बर्‍याचदा अर्धी गोष्ट (हीच अशी नाही, कुठलीही) लिहिल्यावर तुला एकदम कंटाळा येतो. आणि मग तू घाईघाईनी ती संपवून टाकतोस. --खुपदा होतं. आळस नाही पण बाकीच्या प्रिओरिटीज आड येतात. पण ही गोष्ट माझ्या मते पुर्ण आहे. इतक्या सामान्य मुथ्थु माणसाचं दुसरं काय होऊ शकतं? अनेक शक्यता असल्या तरी निदान डझन अर्धा डझन मुथ्थुनां मी ओळखतो. त्रागा करणं आणि षंढ राग व्यक्त करणं ही त्यांची मर्यादा. त्याची दया यायलाच हवी होती.
आता दुसरी गोष्ट जी कुणालाच लक्षात आली नाही. मुथ्थु म्हणजे क्विझोट नव्हे. तो त्याचा (१-क्ष) म्हणजे इन्व्हर्स आहे. क्विझोट आपण आहोत. मुथ्थुला जे शत्रु वाटताहेत, ते शत्रु आहेत, खरे शत्रु आहेत. पण बाकीच्या जगाला ते शत्रु खोटे वाटताहेत म्हणजेच असलेल्या शत्रुला ते अदृष्य शत्रु समजताहेत, म्हणजे ते शत्रु अस्तित्वात नाहीत (तुला कळतय नां?). सिस्टीम मधल्या वाईट गोष्टींना शत्रु मानणारे आता क्विझोट ठरताहेत. आणि हे गडद ठसवण्यासाठी मी पवनचक्कीचं उदाहरण घेतलं. आणि हे उदाहरणही खरंच आहे!
आता आरसा उलटा धरुन परत गोष्ट वाच आणि मला सांग
आपल्याच गोष्टीचं इतकं स्पष्टीकरण द्यावं लागलं की मेजर चिडचिड होते, मला माहीत आहे! तरी ते दिल्याबद्दल आधी आभार. :)
ते 'इन्व्हर्स कीहोते'चं प्रकरण चक्रावून टाकणारं वाटलं, तरी गोष्ट परत वाचली आणि पहिल्या वेळेसारख्या पवनचक्क्या नडल्या नाहीत. त्यामागच्या कल्पनेच्या चमत्कृतीचं नवल वाटलं.
पण तरी, एखादा विनोद ऐकून उत्स्फूर्तपणे आपल्याला फुटलेलं हसणं आणि कुणीतरी तो विनोद 'समजावून' सांगितल्यानंतर तोंडावर येणारं कसनुसं लेट-करंट हसणं यांत बावळटपणाच्या किमान काही डिग्रीजचा तरी फरक असतोच. तितकाच माझ्या पहिल्या आणि नंतरच्या आकलनात आहे. इतका वळसा घ्यावा लागण्याला माझं बेजबाबदार वाचन जबाबदार आहे, की तुझी गोष्ट काहीशी 'कूटप्रश्ना'च्या वळणावरची आहे; ते मात्र मला आता ठरवता यायचं नाही. माझ्यापुरती ही गोष्ट हुकली, हेच खरं.
Samved said…
Appreciate ur view :)
Anonymous said…
I would appreciate more visual materials, to make your blog more attractive, but your writing style really compensates it. But there is always place for improvement