Posts

Showing posts from June, 2012

"मंद्र"च्या निमित्ताने: सोनुबाई आणि कथलाचा वाळा- नवा खो खो

परत एकदा हिंमत दाखवुन नवा खो खो सुरु करत आहे. हिंमत अश्यासाठी की गेले २-३ खो खो साफ फसले आहेत. कारणं माहीत नाही. कधी ब्लॉगे हो म्हणाले पण लिहीलं कुणीच नाही, कधी प्रतिसादच मुळात शुन्य, कदाचित खो खोचे विषय चुकीचे असतील, कधी वेळेचा प्रश्न असतो..काहीही असो पण ब्लॉगची सध्याची परिस्थिती भीषण आहे हे खरं. पण काही लोकांना राष्ट्रभाषेत सांगायचं तर गुडदा इ इ असतो. म्हणून परत एकदा नवा खो खो सुरु करत आहे . खो वाचा, त्याहून महत्वाचं त्यावर प्रतिक्रिया द्या आणि अजून महत्वाचं म्हणजे सहभागी व्हा . सोनुबाई आणि कथलाचा वाळा हा खो खो अश्या पुस्तकांकरिता आहे जे गाजले पण वाचल्यावर हातात भुक्कड काहीही आलं नाही . हा खो खो सुरु करताना काही साक्षात्कार झाले तेही सांगतो म्हणजे तुम्ही परत त्याच घोळात अडकणार नाहीत. हा खो खो जेनरसाठी नाही. म्हणजे आपले नेहमीचे गिऱ्हाईक वपु घ्या आणि कल्हई काढा असं इथे अभिप्रेत नाही. वपु हा एक जेनर आहे, ज्यांना ते आवडतात, त्यांना ते आवडतात. किंवा सु.शि किंवा बाबा कदम हे कसे अभिजात नाहीत यासाठी हा खो खो नाही. तुमच्या नेहमीच्या आवडीच्या किंवा गाजलेल्या लेखकाचं एखादं उगाच गाजवलेल्या...

मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (2)

  Read Part 1 - भाग १ मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (1) ..."नवीन येणाऱ्यात नुस्ता पुष्कर नव्हता . त्याच्या मागोमाग आठवड्याभरात वि . र . सहमोरे सर पण आले , भुगोल शिकवायला .".... वि . रं नी पहील्याच तासाला येताना जगाचा थोर मोठा नकाशा आणला . " अय्या , सरांपेक्षा नकाशाची पुंगळीच जास्त उंचै " चिमणी पुटपुटली चिमणीचं पुटपुटणं बाजाच्या पेटीच्या भाषेत बोलायचं तर सर्वसाधारण वरच्या पट्टीत असतं . वि . रं गर्रकन वळले आणि खडुचा एक ढेलपा त्यांनी उभ्या जागून चिमणीला फेकून मारला . खडू मिसाईल भिरभिरत रस्ता चुकून मिस वनच्या चष्म्यावर ताडकन आपटलं . शंकरानं मदनाला बाण लागल्यावर जसं नजरेनंच जाळून मारलं , अगदी डिट्टो तोच लुक मिस वननं वि . रं ना दिला . वि . र सॉरी म्हणतील अश्या आशेनं किंचित तक्रारवजा सुरात मंजु म्हणाली " सर , खडु मला लागला " नाव काय तुझं ?" चढ्या स्वरात वि . रं चा प्रश्न . मिस मंजु पाटील " मंजुच्या या मिस प्रकरणामुळेच बियाण्यानं तिचं नाव मिस वन ठेवलं होतं . मिस ?" वि . रं चा स्वर कडसर झाला " मातृभाषेत कुमारी असं म्हणतात पाट...

मत्त गे गंडस्थळ झिंगुरांचे (1)

यत्ता आठवी म्हणजे कंच चिंच . कुमार बियाणीनं शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्याभरात आपण माजावर आल्याचा दाखला दिला . त्यानं कुमारी लाहोटीच्या सायकलवर खडुनं आरपार बाण गेलेलं दिल चितारलं आणि सोबत किडमिड्या अक्षरात एक चिठ्ठी . कुमार बियाणी जात , धर्म , सांस्कृतीक आणि त्याहुन महत्वाचं आर्थिक , सामाजीक इ इ सारं सारं अभ्यासुन कुमारी लाहोटीच्या प्रेमात पडला होता . पण हाय रे किस्मत . आदीम काळापासून प्यार का दुश्मन जमाना . अकबरानं जसं अनारकलीला भिंतीत चिणून सलीमच्या प्रेमाचा निक्काल लावला तस्स्संच खेळ शिकवणाऱ्या राठौर सरांनी काडीमात्र बियाण्याला आपल्या साडेसहा फुटी विशाल देहानं ढकलत ढकलत भिंतीच्या एका कोपऱ़्यात जवळ जवळ चिणलाच . ते विस्मयकारी , अभद्र विनोदी , भितीदायक इ इ दृश्य बघून बाजूनं जाणारा डब्बल भिंग्या न किंचाळता तर प्रेमापोटी चिणला गेलेला पहीला वीर म्हणून अनारकलीसारखंच कुमार बियाणीचं नाव झालं असतं . यत्ता आठवीची सुरुवात ही अशी दणदणीत झाली . शाळेत निदान दीड डझन मास्तरांचं नाव कुलकर्णी . त्यामुळे प्रत्येक मास्तरांना विशिष्ट उपनाम होतं . असेच एक आप्पासाहेब कुलकर्णी उर्फ आप्पासाहेब आठवी ड चे वर्गशि...