फट्! म्हणता कविता झाली
झाडे दिसताच
चिमणी झाली
पाणी दिसताच
गाणी झाली
शब्द मिळताच
शहाणी झाली
फट्! म्हणता कविता झाली
चंद्र कोरताच
रात्र झाली
धुक्यामधून
भ्रमिष्ट झाली
मी म्हणताच
विश्व झाली
फट्! म्हणता कविता झाली
वही बुडवताच
गाथा झाली
कोरे पाणी
निळी झिलाई
अर्थ नुरताच
सार्थ झाली
फट्! म्हणता कविता झाली
Comments
सगळ्या कडव्यांची तिसरी ओळ नि सगळ्यांत जास्त तिसरं कडवं - भा-री आहे.
नि नवीन रुपडं पण साजिरं आहे एकदम!
About background- this painting is called Poet. Isn't it mandetory for me to use it then? :)