साहित्यिक भौ- तेरी कहके ले ली रे बावा

म्हणजे संपलंच म्हणायचं एकदाचं! संमेलनाचं सुप वाजलं हा वर्तमानपत्रवाल्यांचा लई लाडका शब्द. तर तेही वाजून झालं.


हल्ली होतं काय आहे की संमेलनाच्या अध्यक्षांची ओळख दिपिका चिखलीयापेक्षाही कमी असते. म्हणजे जे काही बापडे मराठी य्मयेच्या वाटेला गेलेले असतात केवळ तेच अध्यक्षांना साहित्यिकली ओळखु शकतात. आता या उत्सवांना एकदा श्टार व्हॅल्यु नाही म्हटलं की विचारतं कोण? अध्यक्षांनं एक तर लोकप्रिय तरी असावं किंवा समिक्षकप्रिय तरी...रमेश मंत्री, (गेले बिचारे) इंदिरा संतांना हरवुन (!!) अध्यक्ष झालेच होते की. त्यानं होतं काय की एक तर त्यांचा मेशेज जनमनात पोचतो किंवा मायमराठीच्या विचारधारेत ते कसली तरी भर पाडतात. आता काय एकूणच दोन्ही बाबतीत आनंद.

जेव्हा पासून वेडा डब्बा आला, डब्बेवाल्या काकांनी ठरवुनच टाकलं की लोकांना जड, गंभीर काही म्हणजे काही पचत नाही. त्याच चालीवर संमेलनातल्या गंभीर परिसंवादांना फाटा मारण्यात आला. यावेळी म्हणे राजकीय नेत्यांसाठी माझं वाचन की कायसा परिसंवाद ठेवला होता. त्याला बहुतेक बगळ्यांनी दांडी मारली. साहाजिक आहे. राजकारणात टिकायचं म्हणजे साहित्यवगैरे विषयांपासून दुर असलेलं बरं.

हल्ली मराठीत साहित्यीक जमात उदंड झाली आहे. कसंबसं लिहीलेलं एखादं पुस्तक स्वस्तात छापायचं, भाऊ-दादाला सांगून, चार पैशे खर्च करुन कुठल्याश्या अभ्यासक्रमात लावायचं की झाले तुम्ही साहित्यीक. संमेलनात हल्ली मोठ्या प्रमाणावर उंडारते ती ही असली जमात. यांना ऎकायला कोण जाणार? हल्ली चांगलं लिहीतं कोण? एखादी मेघना पेठे एखादा शफात खान, एखादा इंद्रजीत भालेराव, एखादा???.... बाकी चांगलं लिहीणारे खुपसे इंसिडेन्टल लिहीतात. त्यात सातत्य नाही, माहिती असते पण विचार नाही...

बरं ही करमणुक कमी होती की काय म्हणून यावेळी न-साहित्यीक वाद पार गुद्दागुद्दीवर आले. म्हणजे गेल्या संमेलनातही यादवांना वनवासात जावे लागले होते पण यावेळी जाज्वल्य अभिमानी बाहुबलींनी जाळून टाकु, काळं फासु, उधळुन लावु वगैरे अश्या तेजस्वी घोषणा दिल्या. काही शतकांपुर्वी भारता बाहेरुन आलेल्या लुटारुंनी संस्कृतीचा लोप व्हावा म्हणून भली थोर ग्रंथालये जाळली होती म्हणे....असंच युरोपात, बहुदा इंग्रजांच्या देशात, कुठल्याश्या कवीला म्हणे बग्गीवाल्याच्या चाबकाच्या फटक्यांचा त्रास व्हायचा, कविताच सुचायच्या नाहीत म्हणून त्यानं राजाकडे तक्रार केली. तेव्हापासून आजतागायत बग्गीवाल्यांना तिथे चाबूक वापरायची बंदी आहे म्हणे. असो. असते एकेकाची संस्कृती!!

संस्कृतीवरुन आठवलं. आपल्या असंस्कृतपणाबद्दल चर्चिल की कोणीसं एकदम बरोबर सांगून गेला होता की एकदा का आपल्यासारख्या रानटी आणि फसवणुक करणाऱ्यांच्या हातात देश गेला की झालंच कल्याण. त्यातल्या त्यात साहित्य क्षेत्र जरा अराजकिय होतं पण संमेलन फुकट आणि सुंदर करण्याच्या नादात आपण त्याला राजकारण्यांच्या अंगणात नेऊन बांधलं. राजकारण हे भारतातलं असं एकंच क्षेत्र आहे जिथे लायकीपेक्षा उदंड पैसा, प्रसिद्धी आणि पॉवर कमीत कमी श्रमात मिळु शकतात. आपल्या आयुष्यात अराजकिय असं काहीच नाही. आपण चालतो त्या रस्त्याचा टोल, बघतो त्या सिनेमाची निर्मिती, खेळतो त्या संघाची मालकी, खातो त्या धान्याची अडती, बघतो त्या बातम्यांची बातमी इ इ इ राजकारण्यांनी व्यापलेलं आहे. रद्दीचा भाव आणि साहित्य अशी जोड लावणाऱ्या या जमातीला अचानक का बरं पुळका आला संमेलनाचा? उत्तर सिध्धं आहे. विविध निधीतून दिले जाणारे पैसे, खाण्यापिण्याची कंत्राटं, लागणारी वाहानं, उतरायची हाटेलं सगळ्यासगळ्यातून अमाप माया मिळते. शिवाय प्रसिद्धी आणि मायबोलीची सेवा केल्याचं श्रेय आहेच. पण निब्बर कातडीच्या साहित्यिकांना याचं ना दुःख ना खेद.

तर थोडक्यात काय की या वेळी साहित्यिक भौची एकूणंच कह के ले ली असं झालेलं आहे.

ता.क.- फे.बु वर नुक्तीच एका मित्रानं कविता टाकली आहे. पुढंच संमेलन म्हणे पिंपरी चिंचवडात आहे आणि त्यासाठी सोन्याचे सदरे आणि सोन्याच्या चड्यांची ऑर्डर आत्ताच गेली आहे.

वांझोट्या सात्विक संतापापोटी लिहीलेलं पोस्ट वाचवत नसेल तर गरजुंनी पुढील दुवे वाचावेत

बाबुराव हरवले आहेत..!

http://www.loksatta.com/sampadkiya-news/baburao-is-missing-40311/


साहित्यसंमेलन आणि मी

http://meghanabhuskute.blogspot.in/2013/01/blog-post.html

Comments

अप्रतीम. :)
Raj said…
मस्त. सहमत आहेच. :)
भानस said…
























अप्रतीम.:) हसावे का रडावे...






सात्त्विक संताप ठीकच. नि शुंभासारखे मूग गिळून बसणारे तथाकथित साहित्यिक पाहता, त्यांच्या लायकीला शोभेसं झालं हे जे झालं ते, हेही ठीक.

फक्त राजकारण्यांना दिलेल्या शिव्या खटकल्या. म्हंजे भाऊ, तुम्ही तोंडातून चकार काढला नाही, तर कुणीही येऊन तुम्हांला गुंडाळून तुमचं नेसूंचं सोडून नेणारच की राव. राजकारणी झाले तरी काय, खायला भेटतंय की पसरलेच हातपाय. त्यांची चूक नाही. चूक आपली आहे. आपल्याला साहित्य म्हणून दवणीय मुक्ताफळं चालतात. कविता म्हणून ’देवा मला रोज एक अपघात कर’ चालतं. संस्कृती म्हणजे शोभायात्रा नि दरेक वृत्तपत्राच्या पुरवणीत बाजरीची भाकरी नि पुरणाच्या पोळीवर लिहिलेले रसभरित लेख. कुणाच्या भावना दुखावल्या की आपण दिलगिरीची शेपूट घालणार, नि कुणावर बलात्कार बिलात्कार झाल्याचं उघडकीला आलं, तर तिच्या बाईपणाच्या भोगवट्यावर अश्रूपूर्ण कविता फॉरवर्ड करणार.

आपली तीच लायकी आहे.
Samved said…
Thanks Mahendra, Raj, Bhagyashree, Meghana.

Meghana- It is responsibility of rulers to provide certain things to every element of society. What artiest want is very minimal...freedom and environment and that too is denied.