अनहत स्वगतांचे ढळणारे प्रतिध्वनी
॥ थोडं नंतर॥ रात्री ११ ते सकाळी ९ ही सर्वात वाईट ड्युटी. बरेच लोक ड्युटी आणि वाईट हे समानार्थी शब्दच समजतात. रिझवान सिद्दीकीनं घड्याळाकडं हताशपणे बघितलं. बरेच लोक घड्याळ आणि हताशपणा यांनाही समानार्थी शब्द समजतात. घड्याळाचा काटा फकाटपणे हात पसरवून हॉ... करत गेला कित्येक वेळ पावणेतीनचीच वेळ दाखवत होता. खास पोलीस स्टेशनातच वाजु शकतो तसा अश्या भलत्यावेळी रिझवान समोरचा फोन खणखणला. "सर, मॉलसिटी बीट मधून जमाल बोलतोय" विलक्षण उत्तेजित आवाजात जमाल कमालीचा भरभर बोलत होता "इथे अल-बुर्जच्या तीसाव्या मजल्यावरुन एक बाई पडलीए म्हणजे तिला फेकलय असा एका बाईचा फोन आला होता म्हणजे तिनंच फेकलय म्हणे" "जमाल, बाई पडलीए की फेकलीए? आणि मग ती फोन कसा करेल?" रिझवान आवाजातली उत्सुकता दाबत म्हणाला. भिंतीवरची दुबईच्या राजाची तस्वीर त्याच्याकडे बघून उगाच दाढीत हसली. "सर" जमालच्या फुफ्फुसात आता पुरेशी हवा जमली होती "अल-बुर्जच्या तीसाव्या मजल्यावरुन आपण एका बाईला ढकललं असा सांगणारा एका बाईचा फोन आला होता. तिला तिथंच थांबायला सांगून मी तुम्हाला फोन केला. बीट व...