Posts

Showing posts from February, 2015

ढगाच्या कविता

प्रवासी ढगाचे कुणी गीत गावे तुटे थेंब त्याला नदी जीव लावे ढगाचे पिसारे रिता मोर नाचे शब्दात भिजले कुणी अर्थ वाचे ढगाचे अडकणे चालणे न् थबकणे असण्यात नसणे न् दिसण्यात असणे रुजणे ढगाचे धुक्याच्या उश्याशी      खुणा शोधताना उसवणे स्वतःशी      ॥ सयामी॥ प्रवासी ढगाचे कुठे गाव आहे पहाडात हाका उगा येत आहे खुळ्या चांदण्याचे कुसुंबी उखाणे ढगाचा अबोला निळेशार गाणे ढगाच्या नीजेशी स्वप्न माझेच आहे नदीच्या तळाशी तुझे नाव आहे