चल पेरू निळासा थेंब

चल पेरू निळासा थेंब
उश्याशी बिंब
तृणपात्याचे

पाऊस लागला थोर
भुलवला मोर
नृत्यगारांचे

गुणगुण गोंदण रात
नदीचा आर्त
नाद पुराचे

मेघांना थोडे सांग
आवरा रंग
कृष्णकमळांचे

दरवेशाचे ऋण
सावळे उन
तुझ्या पाठीचे

Comments

नदी’चा’ आर्त?

विभक्तीप्रत्ययाचं लिंग चुकलं आहे की माझी समजण्यात काही चूक होते आहे?

कविता वेगळी आहे. पण हे दाताखाली खडा यावा तसं आलं.
Vijay Shendge said…
मेघनाजी. ती चूक लेखकानं जाणिवपूर्वक केली असावी. त्या व्यतिरिक्त इतर बऱ्याच चुका कवितेत आहेत. पण आलीकडे बरेच कवि कवितेच्या नियमात अडकत नाहीत. मी तरी कवितेचा भाव पहातो. बाकी सारे गौण.
कविला बहुतेक आर्त शब्द आवाज या अर्थी वापरायचा आहे! नदीचा ’आर्त’ (आवाज)!
छान वातावरण निर्मिती!
पाऊस काळात भेडसावणारी एक अनामिक हुरहूर जाणवते.
Samved said…
Thanks, I didn't get notification for new comments and hence missed publishing them.
No, actually Meghana is right about Aart , I ought to correct it.
Thanks for comments