प्रतिमांकन: विठ्ठल
॥ विठ्ठल॥
क्षितीजाच्या कडेकडेने रेखावेत थोडे पहाड
मधेच लहरी रेघ गढुळशार नदीची
गडगडत येणारा एखादा
शाळीग्राम
आणि त्यावर कोरलेले तुझे नाव
"विठ्ठल"
ऎकु येतात -
भजनांचे मातकट आग्रही स्वर
अबीरगुलालाच्या प्रतलातून उधळणाऱ्या रुढीजात घोड्यांच्या टापा
वातावरण भोवंडुन टाकणारा श्रद्धावंत कोलाहल
आणि
सखीचे अनहत हाकारे
"विठ्ठल..."
नीजेच्या तळाशी उमलुन येतात पायावरचे भवरे
तरीही
कुणाचे वाट चालणे संपत नाही
कुणाचे वाट पाहाणे संपत नाही
लोंबतात दंतकथांच्या पारंब्या तुझ्या अचल अंगाखांद्यावर
आणि शतकभरात रुजल्याही असतील जमिनीत खोलवर
त्यातून उगवणार मुळमाये पुन्हा नव्याने
तू "विठ्ठल"

Comments
सखीचे अनहत हाकारे"
हे इतकं सोडल्यास मला कविता एकसंध वाटली आणि भावली. वरच्या ओळी मला खरंच बळंच वाटल्या, एकदम खडा लागल्यागत. सोडल्यास काहीही उणं नाही.
सखीचे अनहत हाकारे"
हे इतकं सोडल्यास मला कविता एकसंध वाटली आणि भावली. वरच्या ओळी मला खरंच बळंच वाटल्या, एकदम खडा लागल्यागत. सोडल्यास काहीही उणं नाही.
पण हे माझे स्पष्टीकरण झाले, बरोबरच असावे हा आग्रह नाही