Posts

Showing posts from March, 2016

मी रुजेन

मी रुजेन मावळेन आरश्याच्या काठावर मलाच मी शरण येईन टोचे मारत बांधेन पुसेन शब्दांच्या पुरत्या मयसभा स्वतःवरच हसेन उदो उदो नाचेन थबकेन तुझ्या दारावर कोसळून जाईन झाडातून उगवेन फुलेन काट्याच्या टोकावर मी झाड झाड होईन