माया आणि कबीरची रेल्वेयात्रा
॥ १ ॥ आमचा जायाचा दिवस आला तसा आज्जीचा गोंधल जबरदस्त वाढलाय. तिनं सकाल पासून चार वेला बॅगा उघडल्या-पॅक केल्या शेवटी शुभादि बोल्ली की आता निघे पर्यंत बॅगा उघड्याच राहु दे. आबांचं वेगलंच अस्तं. ते गेलेत कबिरला घेऊन मार्केटात. मला तर मज्जाच वाटतै आणि भितीपण. मी, कबीर आणि शुभादि...तिघं एकटेच जाणार जम्मुपर्यंत! म्हंजे कसं नां की मी मोठ्ठी आहे, फोर्थमधे, पण कबीर अजून फर्स्टमधेच आहे आणि शुभादि कॉलेजात जाते पण तिला जम्मु कुठं माहीतै? म्हंजे सगल्यांना लीड मलाच करायचं...म्हंजे हे असं झालंच नस्तं पण मध्येच बाबा आजारी पडला आणि आईला घाईघाईनं विमानानं जावं लागलं, म्हंजे आज्जी बोल्लीच, गेली पोर्गी उडत आणि आता आम्ही जाणार झुक झुक झुक करत २-३ दिवसात..जम्मुला. सगले लोक उनांत समर वॅकेशनला जम्मुला येतात आणि आम्ही जम्मुहून कोल्लापुरात आलो. पण आबाज्जी कडे खुप मज्जा येते. आंबे, भेल, मिसल...कबीरनं मामाबरोबर जाऊन चोरुन नॉनव्हेजपण खाल्लं, मी पण, शुभादि आणि आबांनीपण...आज्जीसोडून सगल्यांनी. आणि काय काय गिफ्ट...मामीनं लाकडाचा खेलायचा कम्प्लीट सेट दिलाय, त्यात ज्युली नावाची जाडी बार्बी पण आहे (आज्ज...