Posts

Showing posts from May, 2016

पांढऱ्या पायांची काळी मांजर

लोक कधी ही येऊ शकतात. लेकवी (ढ लोकांसाठी: लेखक + कवी = लेकवी) रिकामा असला तरी त्याला आपण उपलब्ध नाहीत सांगायला आवडतं. त्यामुळं आता दार उघडून लेकवी नुक्तेच सुक्ष्मात गेले असं विक्षिप्त उत्तर द्यावं की काय या विचारात असताना दुसऱ्यांदा दारावर टकटक झाली. खरं तर ही अशी सुर्य वितळत असतानाची वेळ म्हणजे व्याकूळ होऊन हातांना शब्दांचं सहावं बोट फुटण्याची वेळ. पण नेमकी लेकवीची दर्दभऱ्या गजलांची सीडी गेले दोन दिवस खरखरत असल्यानं त्याला पुरेसं व्याकूळ होता येत नव्हतं. त्याच्या कुठल्यातरी टेकी फ्याननं सांगीतल्याप्रमाणं त्यानं ती सर्फ मधे बुडवून उन्हात वाळत टाकली होती पण त्या गायकाचा गळा म्हणावा तितका अजून साफ झाला नव्हता. थोडक्यात ऎन संध्याकाळचा लेकवी चक्क मोकळा होता आणि आता तीच ती टकटक परत... साशंक नजरेनं लेकवीनं दार किलंकिलं करुन बघितलं, पण बाहेर कुणीच नव्हतं. लेकवी ऑलमोस्ट अश्रद्धेय असल्यानं त्याचा भुताखेतांवर विश्वास नव्हता पण उगाच धोका नको म्हणून त्यानं ’श्रीराम’ म्हणत सुस्कारा टाकला. दार लावून तो वळला तर नेमकं पायात काही तरी गुबगुबीत अडखळलं. अल्टर ईगोनं यावं तसं अगदी सहजपणे एक मांजर आत आलं ...