हमामा रे पोरा हमामा रे
No, everybody's gotta learn, nobody's born knowin' ... झेनवाले महागुरु म्हणतात तसं नैसर्गिक गोष्टी घडतच असतात, आपण फक्त तेव्हा तिथे असतो; उदा. शाळा सुरु होण्यावेळी ’उन्हाळ्याच्या सुट्टीतला माझा छंद’ टाईप विषयावर निबंध, पाढे-वर्ग-वर्गमुळं यांच्या दुःखद उजळण्या वगैरे वगैरे. कु. सोमेश (नुक्तेच नववी ब) शाळा सुरु होण्या आधी अश्याच काही नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यात मग्न होता. "सोमेश" अशी मधूर हाक दुसऱ्यांदा येऊनही त्यानं दुर्लक्ष केलं कारण शाळेच्या नव्या गणवेशाची निळ्या रंगाची चड्डी अंगावर कशी दिसते याचं निरिक्षण करण्यात तो गुंग होता. त्याला बऱ्याच चिंता पडल्या होत्या उदा. पायांवरची नव्याने उगवलेली लोकर निळ्या रंगाची चड्डी झाकणार नसते वगैरे. हल्ली सोमेशला अश्या चिंता आणि सोबतच हळव्या कविता वगैरे सुचतात- डार्क निळे आकाश सागर फेन्ट निळा निळ्या चड्डीत सोम्या नादखुळा (आपणही ’तुक्या म्हणे’ सारखं ’सोम्या म्हणे’ असा कवि व्हावं का? सोम्यानं लख्ख विचार केला) "सोम्या...." या हाकेत मघासारखी पुंडलिकाची आर्तता नव्हती, शिवाय आवाजा...