जगावेगळी बाई

देखण्या बायांना कळत नाही माझ्यात असं काय निराळं आहे.
तसं बघाल तर,
मला कोणी गो..ड नाही म्हणणार
आणि हो,
बेतलेल्या शरीराच्या चमकदार ठक्यांसारखी मी आखीवरेखीव देखिल  नाही.
पण माझं शरीर- माझे नियम
शंकासुरांनो ध्यानात ठेवा कायम.
खोटं वाटतयं?
माझ्या मर्जीवरच झुलतो
माझ्या कंबरेचा झोका
चाली मधला तोरा
आणि ओठांवरचा धोका.
शहाणी ती बाय
मी
आहेच जगावेगळी.

तुमच्या वर्तुळात बिंधास मी घुसते
तेव्हा मधमाश्यांसारखे फेर धरतात
पुरुष
माझ्याभोवती,
कुणी विस्फारल्या डोळ्यांनी नकळत उभं राहातं
तर कुणी उंच खुर्चीतून गुडघ्यांवर  कोसळतं .
ही जादू
माझ्या चमकदार डोळ्यांची
ही जादू
माझ्या खळखळून हसण्याची
ही जादू
बिनतोड माझ्या ठुमक्याची
आणि आनंदानी थिरकणाऱ्या माझ्या पायांची.
कारण
शहाणी ती बाय
मी
आहेच जगावेगळी.

पुरुषांना प्रयत्न करुनही कळत नाही
नेमकं काय वेगळं आहे माझ्यात.
देहदार पदर काही उलगडून दाखवते तरीही
काही शिरत नाही त्यांच्या सनातन डोक्यात.
खुळ्यांनो,
तुमच्या चौकटीबाहेर आहे माझं देहभान
जे वाहातं पाठीच्या खोल पन्हाळीतून
सांडतं आश्वासक हसण्यातून
कधी हिंदोळतं स्तनांच्या लयींवर
माझंच डौलदार देहभान.
परत सांगते
शहाणी ती बाय
मी
आहेच जगावेगळी.

तुम्हाला कळतंय नां,
मला कुढतमुंडी बनवणं का कठीण आहे ते..
मला चढवावा लागत नाही कधी आवाज
किंवा करावे लागत नाहीत माकडचाळे.
लयदार मी जेव्हा चालत जाते,
तुमचीही मान सहजच उंचावते
अजूनही काही शोधताय?
सापडेल कदाचित
चपलांच्या टाचांच्या चट्चट आवाजात,
केसांच्या वळणावर,
हातांच्या तळव्यात,
काळजीच्या रुळण्यावर.
लक्षात राहील नां?
शहाणी ती बाय
मी
आहेच जगावेगळी.

(माया अंग्लोव यांच्या फिनोमिनल वुमन या कवितेचा स्वैर अनुवाद)

Original poem:

Phenomenal Woman
Pretty women wonder where my secret lies. 
I’m not cute or built to suit a fashion model’s size   
But when I start to tell them, 
They think I’m telling lies. 
I say, 
It’s in the reach of my arms, 
The span of my hips,   
The stride of my step,   
The curl of my lips.   
I’m a woman 
Phenomenally. 
Phenomenal woman,   
That’s me. 

I walk into a room 
Just as cool as you please,   
And to a man, 
The fellows stand or 
Fall down on their knees.   
Then they swarm around me, 
A hive of honey bees.   
I say, 
It’s the fire in my eyes,   
And the flash of my teeth,   
The swing in my waist,   
And the joy in my feet.   
I’m a woman 
Phenomenally. 

Phenomenal woman, 
That’s me. 

Men themselves have wondered   
What they see in me. 
They try so much 
But they can’t touch 
My inner mystery. 
When I try to show them,   
They say they still can’t see.   
I say, 
It’s in the arch of my back,   
The sun of my smile, 
The ride of my breasts, 
The grace of my style. 
I’m a woman 
Phenomenally. 
Phenomenal woman, 
That’s me. 

Now you understand 
Just why my head’s not bowed.   
I don’t shout or jump about 
Or have to talk real loud.   
When you see me passing, 
It ought to make you proud. 
I say, 
It’s in the click of my heels,   
The bend of my hair,   
the palm of my hand,   
The need for my care.   
’Cause I’m a woman 
Phenomenally. 
Phenomenal woman, 
That’s me.

Maya Angelou, “Phenomenal Woman” from And Still I Rise.


Comments