म्हशींचे भावोत्सुक बडाम् बुडूम्


बडाम् बुडूम्
बडाम् बुडूम्
गोठ्यामधल्या रवंथ म्हशी
काड्या चावती कडाम् कुडूम्

त्यांचं शेपूट केव्हढं थोर
त्यांनी हाकलतात रंगीत मोर
वाट्टेल तिथे दात काढत
हसत राहातात धडाम् धुडूम्

त्यांचे डोळे भोचक फार
शिण्मे चावतात दिवसा चार
काना-मात्रा अक्षर खात
डुंबत राहातात  फडाम् फुडूम्

त्यांची शिंगे आखूड ठार
गोठ्यामधे जोर का वार
थव्यामधे उडत बिडत
जागेवरच तडाम् तुडूम्

बडाम् बुडूम्
बडाम् बुडूम्

Comments

Gayatri said…
:)) तुडुंब आवडली!